
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्री काही काळ मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र, तिने परत एकदा चित्रपटांच्या शूटिंगला सुरूवात केलीये. यादरम्यान दीपिका पादुकोणला अत्यंत मोठा झटका ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिला. थेट अभिनेत्रीला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या वादावर अभिनेत्री माैन सोडले असून निर्मात्यांना चांगलेच फटकारले. दीपिकाने अभिनेता शाहरूख खान याच्या हातामध्ये हात घालून फोटो शेअर करत खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.
दीपिकाने शाहरूख खान याच्यासोबत मिळून किंग चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, शाहरूख खानसोबत पदार्पणातून त्याने मला एक पहिला धडा शिकवला तो म्हणजे चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता ते सर्वात महत्त्वाचे आहे. दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जवळपास 18 वर्षांपूर्वी ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरूखने मला पहिला धडा शिकवला तो म्हणजे चित्रपट बनवण्याचा अनुभव आणि तो बनवणारे लोक त्याच्या यशापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात.
पुढे दीपिकाने म्हटले की, मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे आणि तेव्हापासून मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात ही गोष्ट लागू केलीये. मला वाटते की, यामुळेच कदाचित आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. ही पोस्ट दीपिका पादुकोण हिने शाहरूख खानला टॅग देखील केलीये. तिने “किंग अँड डे 1.” असे म्हटले. दीपिका पादुकोण आणि शाहरूख खान सहाव्या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. दोघांची जोडी कायमच हीट ठरलीये.
प्रभासच्या कल्की 2898 एडी’ चित्रपटातून अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने दीपिका पादुकोण हिला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जाते. या चित्रपटातून दीपिकाला काढण्यात आल्याची अनेक कारणे ही सध्या सांगितले जात आहेत. दीपिकाने फिस जास्त घेतली होती आणि काम कमी तास करेल अशी तिची अट असल्याची चर्चा आहे.