बाई माणूस आहेस म्हणून तुझी…, महिलांसाठी कठीण बॉलिवूडचा मार्ग, दिया मिर्झाकडून धक्कादायक सत्य समोर

Dia Mirza on Bollywood: बाई माणूस आहेस म्हणून तुझी..., ग्लॅमरस विश्वातील धक्कादायक सत्य उघड, दिया मिर्झाने सांगितली सत्य परिस्थिती, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिया मिर्झा हिच्या वक्तव्याची चर्चा...

बाई माणूस आहेस म्हणून तुझी..., महिलांसाठी कठीण बॉलिवूडचा मार्ग, दिया मिर्झाकडून धक्कादायक सत्य समोर
| Updated on: Sep 10, 2024 | 11:59 AM

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण तरी देखील अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करत असताना दिया हिच्या आयुष्यात अनेक चढ – उतार आले. पण अभिनेत्री कधी मागे वळून पाहिलं नाही. ‘तेरे दिल में’ सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आली. सिनेमातील ‘लव्हस्टोरी’ देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. दिया फक्त सिनेमांमुळे नाही तर, तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे देखील चर्चेत असते.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिया मिर्झाने अभिनेत्रींच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील महिलांचा प्रवास फार कठीण होता. दिया हिने देखील अनेक प्रसंगांचा सामना केला आहे. पूर्वी इंडस्ट्रीमध्ये महिलांना कशी वागणूक मिळायची… यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.

दिया मिर्झा म्हणाली, ‘करियरच्या सुरुवातील मी घाबरली होती. कारण मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये एवढंच सांगितलं जातं की, तू एक महिला आहेस. त्यामुळे तुझं करियर ठराविक काळापर्यंत असेल. जर तुझं वय 20 आहे तर, तुला सेलिब्रिटींसोबत कास्ट केलं जाणार नाही. पुरुष अभिनेत्यांना देखील एका ठराविक वयाची अभिनेत्री हवी असते. तुम्हाला स्वतःला योग्यप्रकारे दाखवता आलं पाहिजे.’

 

 

‘महिला अभिनेत्रींचं वजन देखील ठरलेलं असलं पाहिजे… 2000 मध्ये प्रत्येक अभिनेत्रीला या प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. शिवाय तुमच्या आयुष्यात कोणता पुरुष नसला पाहिजे… तुम्ही सिंगल असायला हवे…’ असा खुलासा दिया मिर्झा हिने केला आहे. सध्या सर्वत्र दिया मिर्झा हिची चर्चा रंगली आहे.

दिया मिर्झा हिचे सिनेमे

दिया हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. नुकताच अभिनेत्री ‘IC 814: द कंधार हाईजॅक’ सीरिजमध्ये दिसली. सीरिजमध्ये अभिनेत्रीने एका पत्रकार महिलेच्या भूमिकेला न्याय दिला. सीरिजमध्ये अभिनेत्रीसोबत नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, विजय वर्मा, कुमुद मिश्रा आणि मनोज पाहवा यांसारख्या सेलिब्रिटींनी मुख्य भूमिका बजावली.

दिया मिर्झा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दिया मिर्झा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.