खान कुटुंबात पुन्हा वाजणार सनई चौघडे? सोहैल खानच्या आयुष्यात मिस्ट्री गर्लची एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

Sohail Khan With Mystery Girl: अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर सोहैल खान देखील अडकणार विवाहबंधनात, मिस्ट्री गर्लसोबत अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, चर्चांना उधाण, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोहैल सोबत दिसलेल्या मुलीची चर्चा...

खान कुटुंबात पुन्हा वाजणार सनई चौघडे? सोहैल खानच्या आयुष्यात मिस्ट्री गर्लची एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 9:42 AM

अभिनेता सलमान खान याचा भाऊ सोहैल खान त्याच्या कामामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. आता देखील सोहैल खान खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या सोहैल खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोहैल एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. सोहैलला मिस्ट्री गर्ल सोबत स्पॉट केल्यानंतर चार्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. डीनर डेट दरम्यान सोहैल आणि मिस्ट्री गर्लला कॅमेऱ्यात स्पॉट करण्यात आलं.

मिस्ट्री गर्लसोबत सोहैल खान याला स्पॉट केल्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा जोर धरत आहे. तर, खान कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार अशी देखील चर्चा रंगली आहे. पण दोघांच्या नात्याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय सोहैल याने देखील यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सोहैल खान याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

सोहैल खान याचा घटस्फोट

सोहैल खान याचं पहिलं लग्न सिमा सचदेवा हिच्या सोबत 1998 मध्ये लग्न झालं होतं. अनेक वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर दोघांनी देखील परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये सोहैल आणि सिमा यांचा घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघांमधील पती-पत्नीचं नातं संपलं असलं तरी, मैत्री कायम आहे.

सोहैल खान आणि सिमा सचदेवा यांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण खान आणि लहान मुलाचं नाव योहान खान असं आहे. सांगायचं झालं तर, दोन्ही मुलांचा जन्म सरोगेसीच्या माध्यमातून झाला आहे. सोहैल खान आणि सिमा सचदेवा यांचं लग्न 24 वर्षांपर्यंत टिकलं…

सोहैल याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, करियरच्या सुरुवातील अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण त्याला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. पण सोहैल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.