Disha Paatni | दिशा पाटनी हिचा ग्लॅमरस आणि बोल्डनेस पाहून चाहतेही थक्क, अभिनेत्रीचा जबरदस्त लूक

बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. दिशा पाटनी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दिशा पाटनी हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ हे देखील सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात.

Disha Paatni | दिशा पाटनी हिचा ग्लॅमरस आणि बोल्डनेस पाहून चाहतेही थक्क, अभिनेत्रीचा जबरदस्त लूक
| Updated on: Aug 31, 2023 | 4:59 PM

मुंबई : दिशा पाटनी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दिशा पाटनी (Disha Paatni) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून दिशा पाटनी ही बाॅलिवूड अभिनेता टायगर श्राॅफ (Tiger Shroff) याला डेट करत होती. मात्र, यांच्या ब्रेकअपच्या चर्चा तुफान रंगताना काही दिवसांपूर्वीच दिसल्या. इतकेच नव्हे तर दिशा पाटनी आणि टायगर श्राॅफ यांनीही आपल्या ब्रेकअपच्या चर्चांवर भाष्य करणे टाळले आहे. टायगर श्राॅफ याचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे.

दिशा पाटनी आणि टायगर श्राॅफ याचे ब्रेकअप झाल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगितले गेले. टायगर श्राॅफ याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पाटनी हे थेट विदेशात धमाल करताना दिसली. यावेळी विदेशात दिशा पाटनी बाॅलिवूड अभिनेत्री माैनी राॅय हिच्यासोबत गेली. यावेळीचे अनेक फोटो हे दिशा पाटनी हिने सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे माैनी राॅय आणि दिशा पाटनी या धमाल करताना दिसल्या.

नुकताच आता दिशा पाटनी हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये दिशा पाटनी हिने काळ्या रंगाची ब्रॉलेट घातल्याचे दिसत आहे. यावेळी दिशा पाटनी हिने केस मोकळे सोडले आहेत. या काळ्या रंगाच्या ब्रॉलेटमध्ये दिशा पाटनी हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे.

पापाराझी यांच्याकडे पाहून काही पोज देताना देखील दिशा पाटनी ही दिसली आहे. विशेष म्हणजे दिशा पाटनी हिचे व्हायरल होणारे हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट देताना देखील दिसत आहेत. दिशा पाटनी ही कायमच आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देताना दिसते.

दिशा पाटनी हिचे व्हायरल होणारे हे फोटो अभिषेक कपूर याच्या मुंबईतील आॅफिस बाहेर पडतानाचे आहेत. दिशा पाटनी ही अभिषेक कपूर याला भेटण्यासाठी त्याच्या आॅफिसमध्ये पोहचली होती. दिशा पाटनी हिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यास इच्छुक आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या चित्रपटात दिशा पाटनी ही धमाका करणार हे कळू शकले नाहीये.

काही दिवसांपूर्वीच दिशा पाटनी हिने एक अत्यंत खास असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दिशा पाटनी ही बिकिनीमध्ये दिसली. यावेळी तिच्या बाजूला सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. यावेळी दिशा पाटनी हिचा जबरदस्त असा लूक दिसत होता. विशेष म्हणजे चाहत्यांना दिशा पाटनी हिचा तो व्हिडीओ तूफान आवडला होता.