जया बच्चन यांचा थेट रेखा यांना टोमणा, ही मोठी गोष्ट खटकली, म्हणाल्या, मी कधीच…

अभिनेते अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगताना दिसली, हेच नाही तर जया बच्चन यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे रेखा यांच्यासोबत अफेअर होते. जया यांनी मोठा टोमणा आता रेखाला मारल्याचे बघायला मिळतंय.

जया बच्चन यांचा थेट रेखा यांना टोमणा, ही मोठी गोष्ट खटकली, म्हणाल्या, मी कधीच...
Rekha Jaya Bachchan
| Updated on: Jan 13, 2026 | 9:30 AM

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जया बच्चन बेधडकपणे विधाने करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पापाराझींबद्दल एक विधान केले, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. अनेकांनी थेट जया बच्चन यांच्यावर टीका केली. जया बच्चन यांच्यासोबत लग्न झाल्यानंतरही अनेक वर्ष अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे नाव जोडले गेले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगताना दिसल्या. हेच नाही तर अमिताभ बच्चन यांच्या पार्टीमध्ये रेखा या चोरून गेल्या होत्या. यावेळी त्यांना काहीवेळ बाथरूममध्ये थांबण्याची वेळ आली. आजही रेखा या भांगामध्ये कुंकू लावतात. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर कायमय भाष्य करणे जया बच्चन यांनी टाळले. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्या फोटोची किस घेताना रेखा या दिसल्या. रेखा 71 वर्षाच्या असून आजही त्या एखाद्या तरूणीसारखे राहतात. खास लूकमध्ये त्या कोणत्याही कार्यक्रमात पोहोचतात.

रेखा यांनी या वयातही तरूण दिसण्यासाठी काही शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. रेखा टकाटक राहतात. मात्र, त्या तुलनेत जया बच्चन यांचे तसे अजिबात नाही. हेच नाही तर जया बच्चन त्यांचे पांढरे केस लपवत देखील नाहीत. नुकताच जया बच्चन यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्या बोटॉक्स ट्रेंडवर बोलताना दिसल्या. म्हातारपणे स्वीकारले पाहिजे म्हणत त्यांनी थेट रेखा यांना टोमणा मारल्याचे सांगितले जाते.

जया बच्चन यांनी म्हटले की, मी कधीच चेहऱ्यावर कोणतेही उपचार घेतले नाहीत. भविष्यात देखील माझा असा कोणताही विचार नाही. मुळात म्हणजे वृद्धत्व हा एक चांगला आणि सुंदर अनुभव आहे. वृद्धत्व लपून ठेवण्याऐवजी स्वीकारले पाहिजे. जया बच्चन यांचे बोलणे ऐकून त्यांनी थेट रेखा यांना टोमणा मारल्याचे सांगितले जाते. कोणताही कार्यक्रम असो किंवा पुरस्कार सोहळा जया बच्चन साध्या लूकमध्ये दाखल होतात.

हेच नाही तर त्यांचे केसही पांढरे आहेत. दुसरीकडे रेखा या मेकअप करून येतात. त्या कायमच आपले वाढलेले वय लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. रेखा मुंबईमध्ये एकट्याच राहतात. जया बच्चन मागे काही दिवसांपूर्वीच बोलताना म्हणाल्या होत्या की, तुम्ही लोक जुन्या गोष्टी कशाला काढतात. जया बच्चन यांना अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरबद्दल कळाले होते. आजही रेखा या अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करतात असे सांगतले जाते.