जया बच्चन मनातून खचल्या, मुलगी श्वेता बच्चन थेट म्हणाली, पप्पांना जाऊ दे…

अभिनेत्री जया बच्चन कायमच चर्चेत असतात. जया यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटात काम केले. मात्र, जया यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल यामध्ये त्या चिडताना दिसतात. नुकताच जया बच्चन यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

जया बच्चन मनातून खचल्या, मुलगी श्वेता बच्चन थेट म्हणाली, पप्पांना जाऊ दे...
Jaya Bachchan
Updated on: Dec 03, 2025 | 7:59 AM

जया बच्चन यांनी मोठा काळ बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला. मात्र, त्यांनी अचानक चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. जया बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष रंगताना दिसल्या. जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामुळे त्या चिडताना आणि रागावताना दिसतात. जया बच्चन अशा का वागतात? अशाही प्रश्न अनेकदा लोकांना पडतो. नुकताच जया बच्चन यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. फार कमीवेळा जया बच्चन या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. मात्र, त्यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही.

नुकताच जया बच्चन यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना म्हटले की, मला श्वेता आणि अभिषेक झाल्यानंतरही काम करायचे होते. मी शूटिंगला जात होते. मुलांची काळजी घेण्यासाठी घरी बरेच लोक होती. आमचे मोठे कुटुंब होते आणि आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो. मात्र, मुलांना वेळ मी अधिक द्यावा, याकरिता मी कायमच घरातूनच मेकअप करून सेटवर पोहोचत. कारण मला तितका जास्त वेळ त्यांच्यासोबत राहता येईल.

एकादिवशी शूटिंगला जाण्यासाठी मी घरात मेकअप करत होते. त्यावेळी श्वेता माझ्याजवळ आली आणि म्हणाली की, तू हे काय करत आहे. मी तिला सांगितले की, मी मेकअप करत आहे… श्वेताने मला चेहऱ्यावरील हावभाव बदलून आणि अत्यंत विनंतीपूर्वक म्हटले की, तू नको जाऊ… पप्पाला जाऊ दे… तिचे ते बोलणे ऐकून माझे मन भरून आले. मी काही मिनिटे शांत राहिले. त्यावेळी मी ठरवले की, आता माझी थांबण्याची वेळ आली आहे.

त्यानंतर मी अनेक चित्रपटांना नकार देण्यास सुरूवात केली. मला सतत त्याच त्याच भूमिकांसाठी ऑफर येत होत्या. नवीन काही येत नव्हते. मग मी पत्नी आणि आईच्या भूमिकेत आली. मी माझ्या मुलांसाठी ब्रेक घेतला. मात्र, त्यानंतर श्वेताचे लग्न झाले, त्यानंतर मला काहीच सूचत नव्हते. तिच्या लग्नानंतर मला रडू येत होते आणि एकटेपणा जाणवत होता. मग मी पुन्हा एकदा काम करण्याचा निर्णय घेतला. मी असे काही सांगितले की, माझ्या मुलीला राग येतो.