
बॉलिवूडचं विश्व बाहेरून पाहायला प्रचंड ग्लॅमरस आणि आकर्षक वाटतं पण आतल्या गोष्टी बाहेर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजते. आता पर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या निधनाचं कारण एका रहस्य आहे.. असंच एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. ही कहाणी आहे बॉलिवूड अभिनेत्री लैला खान हिची… 1978 मध्ये रेश्मा पटेल या नावाने जन्मलेल्या लैला हिने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वफा: अ डेडली लव स्टोरी’ सिनेमात काम केलं होतं. सिनेमात अभिनेते राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. अशात अभिनेत्रीच्या आयुष्यात असं एक वळण आलं जेव्हा तिच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्वांना मोठा धक्का बसला…
2011 मध्ये अभिनेत्री आयुष्यात एक दुःखद वळण आलं जेव्हा तिच्या कुटुंबातील पाच इतर सदस्यांसह तिची हत्या करण्यात आली. सांगायचं झालं तर, राजेश खन्ना यांच्या सोबतचा तिचा सिनेमा यशस्वी झाला नाही पण या सिनेमाने तिला चांगलंच प्रसिद्धीच्या झोतात आणलं.
सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली कारण सिनेमात राजेश खन्ना आणि लैला यांचे अनेक बोल्ड सीन होते. दोघांच्या वयात देखील 28 वर्षांचं अंदर होतं. तेव्हा राजेश खन्ना यांचं वय 60 पेक्षा जास्त होतं, तर लैला हिचं वय जवळपास 20 वर्ष होतं. त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीने चाहत्यांना देखील चकित केलं… सिनेमात अनेक बोल्ड सीन होते.
राजेश खन्ना यांच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली. पण त्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये अभिनेत्रीचा सहभाग असल्याची माहिती देखील आली. रिपोर्टनुसार, लैला आणि तिचं कुटुंब दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्या लोकांशी संपर्कात असल्याचं आढळल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये देखील खळबळ माजली होती.
याप्रकरणाने वेगळं वळण घेतलं तेव्हा वळण घेतलं जेव्हा 2011 मध्ये लैला आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे तिचा सावत्र वडील परवेझ टाक असल्याचं तपासात उघड झालं. चौकशीदरम्यान टाकने मालमत्तेच्या वादातून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, परवेझ हे लैला हिच्या आईचे तिसरे पती होते. 2024 मध्ये परवेझ याला कोर्टाने दोषी ठरवलं आणि त्याला भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत खून आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं.