कंगनानंतर आणखी एक अभिनेत्री लोकसभा निवडणूक लढणार, बड्या नेत्याच्या मुलीसाठी जोरदार फिल्डिंग?

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना आता तिकीटासाठी प्रत्येकजण फिल्डिंग लावत असल्याचं दिसत आहे. अशातच प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घ्या.

कंगनानंतर आणखी एक अभिनेत्री लोकसभा निवडणूक लढणार, बड्या नेत्याच्या मुलीसाठी जोरदार फिल्डिंग?
| Updated on: Mar 24, 2024 | 11:36 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा ही कायमच चर्चेत असते. नेहा शर्मा हिने बाॅलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. नेहा शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून तशी अभिनयापासून दूर आहे. मात्र, असे असतानाही नेहा शर्मा ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. नेहा शर्मा कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नेहा शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नेहा शर्मा हिच्याबद्दल एक चर्चा  रंगताना दिसत आहे. यानंतर आता तिच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय.

बाॅलिवूड चित्रपटांनंतर आता नेहा शर्मा ही राजकारणात देखील धमाका करताना दिसणार आहे. नेहा शर्मा ही राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जातंय. आता याबद्दलच मोठा खुलासा करण्यात आलाय. नेहा शर्मा ही थेट लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जातंय. याबद्दलचे विधान हे तिच्या वडिलांकडूनच करण्यात आलंय.

नेहा शर्मा हिचे वडील राजकारणत सक्रिय असून काँग्रेसचे नेते अजय शर्मा यांची लेक नेहा शर्मा आहे. नेहा शर्माचे वडील बिहारमधील भागलपूरचे आमदार आहेत. काँग्रेसला भागलपूर मिळाले तर आम्ही लढू आणि जिंकू असे त्यांनी म्हटले आहे. माझी मुलगी नेहा शर्मा हिने निवडणूक लढवावी, असे मला वाटते, असेही अजय शर्मा यांनी म्हटले आहे.

लोकसभेसाठी नेहा शर्मा ही निवडणूक लढणार असल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, याबद्दल अजूनही अभिनेत्रीने काहीच भाष्य केले नाहीये, यामुळे खरोखरच नेहा शर्मा ही निवडणूक लढणार का याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहे. जर भागलपूरमधून लोकसभेची निवडणूक नेहा शर्मा हिने लढली तर काँग्रेसला फायदा होईल, असे सांगितले जात आहे.

नेहा शर्मा हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे, यामुळे ही लढत अटीतटीची ठरणार असल्याची चर्चा आहे. नेहा शर्मा हिने तुम बिन 2, जोगीरा सारा रा रा, यंगिस्तान’, क्या सुपर कूल हैं हम, ‘जयंताभाई की लव्ह स्टोरी’, तान्हाजी’, यमला पगला दीवाना 2 अशा चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.