Parineeti Raghav Wedding Card | ‘या’ दिवशी 4 वाजता पार पडणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा, पाहा लग्न पत्रिका

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. शेवटी आता यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे.

Parineeti Raghav Wedding Card | या दिवशी 4 वाजता पार पडणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा, पाहा लग्न पत्रिका
| Updated on: Sep 13, 2023 | 5:34 PM

मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते बघत आहेत. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. अगोदर मैत्री आणि नंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्षे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी एकमेकांना डेट केले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सर्वात अगोदर मुंबईमध्ये स्पाॅट झाले. तेंव्हापासूनच यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा रंगली.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी काही महिन्यांपूर्वीच दिल्ली येथे अत्यंत शाही थाटात साखरपुडा केला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला अत्यंत कमी लोक उपस्थित होती. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुडयासाठी प्रियांका चोप्रा हिने देखील हजेरी लावली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील साखरपुड्याला कुटुंबासोबत उपस्थित होते.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची पत्रिका पुढे आलीये. राजस्थानमध्येच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लग्न करणार आहेत. यांचे लग्न देखील शाही पद्धतीने पार पडणार आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 24 सप्टेंबर रोजी पंजाबी रितीरिवाजाने पार पडणार आहे. उदयपूरच्या लीला आणि ताज लेक पॅलेसमध्ये लग्न होईल. यांचे लग्न 24 सप्टेंबर रोजी 4 वाजता होणार आहे. विशेष म्हणजे त्याच रात्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे रिसेप्शन देखील पार पडणार आहे. रिसेप्शन दोन ठिकाणी होणार असल्याचे देखील अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे मुंबई विमानतळावर स्पाॅट झाले. सध्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी काही दिवसांपूर्वीच विदेशात शाॅपिंगही केल्याचे सांगितले जात आहे.