
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी काहीच चित्रपटांद्वारे चित्रपचसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली. काही चित्रपटानंतरच अभिनेत्री गायब बॉलिवूडमधून झाल्या म्हणजे चित्रपटसृष्टीपासून स्वत:ला दूर केलं. अशीच एक अभिनेत्री आहे जीने अनिल कपूर, संजय दत्तसोबतही काम केललं आहे. तसेच काहीच चित्रपटांच्या माध्यमातून तिने आपली एक वेगळी ओळखंही निर्माण केली होती. पण अचानक ती बॉलिवूडमधून गायब झाली. आणि आता 28 वर्षांनी पाहिल्यानंतर तिला ओळखंणही कठीण झालं आहे.
अभिनयाचे कौतुक झाले
ही अभिनेत्री म्हणजे पूजा बत्रा. 1997 मध्ये ‘विरासत’ आणि ‘भाई’ या चित्रपटांमधून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. समीक्षकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले आणि चाहत्यांनी पूजा बत्राला खूप पसंत केलं. त्यानंतर तिने ‘भाई’, ‘हसीना मान जायेगी’, ‘दिल ने फिर याद किया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिची नंतरची कारकीर्द फारशी खास नव्हती.
लग्नाच्या काही वर्षांनी अभिनेत्रीचा घटस्फोट
अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, अभिनेत्रीने अमेरिकन डॉक्टर सोनू अहलुवालियाशी लग्न केले, त्यानंतर ती अमेरिकेत स्थलांतरित झाली आणि तिथे नवीन आयुष्य सुरू केलं. अनेक वर्षे आनंदी वैवाहिक जीवन जगल्यानंतर या जोडप्यामधील अंतर वाढू लागले आणि 2011 मध्ये अमेरिकन न्यायालयात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने 4 जुलै 2019 रोजी अभिनेते नवाब शाहशी तिने गुपचूप लग्न केले.
तिचे फोटो पाहून चाहत्यांनाही तिला ओळखणे कठीण
अभिनेत्री पूजा बत्रा सध्या कॅलिफोर्नियामध्ये आहे. ती मोठ्या पडद्यावर कमी दिसली तरी, ती सोशल मीडियाद्वारे ती सक्रिय असते. आताही तिने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले, ज्यामध्ये ती ‘द हंटिंग्टन लायब्ररी आर्ट म्युझियम अँड बोटॅनिकल गार्डन’ मध्ये दिसत आहे. पूजा पात्राने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला ‘द हंटिंग्टन लायब्ररी, आर्ट म्युझियम अँड बोटॅनिकल गार्डन’ चा संग्रह खूप आवडतो. त्यांची पुस्तके आणि कला अद्भुत आहे” पण तिचे फोटो पाहून चाहत्यांनाही तिला ओळखणे कठीण झालं आहे.
अभिनेत्रीच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने
अभिनेत्री पूजा बत्राची कुटुंबाची लष्करी पार्श्वभूमी आहे, तिचे वडील कर्नल होते. पूजाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने केली. अभिनेत्रीने मिस इंडिया स्पर्धेत 1993 रोजी भाग घेतला, त्यानंतर तिला मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पूजा कदाचित अव्वल स्थानावर नसली तरी, तिची गणना निश्चितच टॉप मॉडेल्समध्ये होऊ लागली होती.