Raveena Tandon: 4 मुलांची आई रवीना टंडनची खास पोस्ट; म्हणाली, ‘सर्वात वाईट वेळ म्हणजे…’

Raveena Tandon Emotional Post: 4 मुलांसोबत रवीना टंडनची खास पोस्ट, आईच्या मनातील भावना व्यक्त करत म्हणाली, 'सर्वात वाईट वेळ म्हणजे...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रवीना टंडन हिच्या पोस्टची चर्चा...

Raveena Tandon: 4 मुलांची आई रवीना टंडनची खास पोस्ट; म्हणाली, सर्वात वाईट वेळ म्हणजे...
| Updated on: Aug 31, 2024 | 8:50 AM

अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलिवूडपासून दूर असली तरी अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. शिवाय रवीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये रवीना तिच्या चार मुलांसोबत दिसत आहे. रवीना हिच्या चार मुलांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. तर एक मुलगा आणि एका मुलाला अभिनेत्री जन्म दिला आहे. आता अभिनेत्री चारही मुलांसोबत फोटो पोस्ट करत भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. सध्या अभिनेत्रीने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मुलांसोबत फोटो पोस्ट करत रवीना म्हणाली, ‘वेळ किती वेगाने जातो… मुलं मोठी होतात आणि एक दिवस त्यांना सोडण्याची वेळ येते. प्रत्येक आईसाठी मुलांना सोडण्याची वेळ वाईट असते. कारण मुलांमध्ये आईचं पूर्ण जग असतं… मुलांना उडण्यासाठी पंख द्या… त्यांना कायम भरारी घेत राहू द्या…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

 

 

रवीना हिने दत्तक घेतलेल्या मुलींची नावं पूजा आणि छाया आहे. तर रवीनाच्या लेकीचं नाव राशा थडानी आणि मुलाचं नाव रणबीरवर्धन थडानी असं आहे. अभिनेत्री कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रवीनाच्या प्रत्येक पोस्टवर फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

रवीना टंडन हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नुकताच अभिनेत्री ‘केजीएफ चॅप्टर 2’ सिनेमात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. सिनेमा रवीना हिच्यासोबत अभिनेताा यश, संजय दत्त, प्रकाश राज आणि अभिनेत्री श्रीनिधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली.

रवीना हिने अरबाज खान निर्मित ‘पटना शुक्ला’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका बजावली. सिनेमात अभिनेत्रीसोबत मानव विज, चंदन रॉय सान्याल, सतीश कौशिक, अनुष्का कौशिक, जतिन गोस्वामी यांसारखे कलाकार होते. आता रवीना ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘घुडचढी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील रवीनाच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत.