
Rekha – Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. एक काळ असा होता, जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरलेला. आजही रेखा आणि बिग बी यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. सांगायचं झालं तर, रेखा यांनी अनेकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं.
एका मुलाखतीत रेखा यांना विचारण्यात आलं, ‘अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना कधी त्यांच्यावर प्रेम झालं.? यावर होकार देत, रेखा म्हणाल्या, ‘हा काय मुर्खासारखा प्रश्न आहे… मी आजपर्यंत अशी कोणती महिला, पुरुष किंवा लहान मुलांना भेटली नाही… जे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करत नाही… प्रत्येक जण बिग बींवर प्रेम करतं…’
‘असं असताना मला वेगळं करुन हा प्रश्न का विचारला जातो? मी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करत नाही…यावर कधीच नकार देणार नाही.’ एवढंच नाही तर, यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर आधारित एका पुस्तकात लिहिलं आहे की..’जगभरातलं प्रेम तुम्ही घ्या… काही आणखी माणसं जोडा… इतकं प्रेम मी तुमच्यावर करते…’
यानंतर रेखा यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केलेला… रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या सर्व नात्याला नकार दिला… रेखा म्हणालेल्या, ‘माझं कधीच अमिकाभ बच्चन यांच्यासोबत खासगी संबंध नव्हते. रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत… अमिताभ बच्चन यांच्यावर मी कधी प्रेमिका म्हणून प्रेम केलं नाही. एक चाहती म्हणूनच मी त्यांच्यावर प्रेम केलं’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.
‘अमिताभ बच्चन यांच्यावर माझं प्रेम आहे… पण आमच्यामध्ये खासजी संबंध कधीच नव्हते…’ असं देखील रेखा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. प्रोफेशनल आयुष्यात रेखा यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या. पण खासगी आयुष्यात मात्र रेखा यांनी अनेकदा चढ – उतारांचा सामना केलं
रेखा यांच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर रेखा यांनी एक उद्योजकासोबत लग्न केलं. पण लग्नच्या 6 महिन्यांनंतर रेखा यांच्या पतीन स्वतःलं संपवलं. आता रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत.