Malaika Arora: फक्त 3 मिनिटांत मलायकाने कमावले इतके कोटी, अनेक वर्षानंतर केलं असं काम…
Malaika Arora: 'त्या' एका कामामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोराची चर्चा, अभिनेत्रीने 3 मिनिटांत कमावले कोट्यवधी रुपये, आकडा जाणून उंचावतील भूवया..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा हिची चर्चा...

Malaika Arora: बॉलिवूडची आयटम गर्ल मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सांगायचं झालं तर, मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता एका व्हिडीओमुळे सर्वत्र मलायका हिच्या चर्चा रंगल्या आहेत. मलायका हिच्यावर चित्रित पॉयजन बेबी (Poison Baby) गाणं प्रदर्शित झालं आहे. गाण्यात मलायकाने भन्नाट डान्स केला. ‘पॉयजन बेबी’ हे गाणं अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘थामा’ सिनेमातील आहे. ‘पॉयजन बेबी’ गाण्याच्या माध्यमातून मलायका अनेक वर्षांनंतर आयटम सॉग्नवर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
‘पॉयजन बेबी’ गाण्यात फक्त मलायका हिनेच नाही तर, रश्मिकाने देखील दमदार डान्स केला. पण सर्वांच्या नजरा मलायका हिच्यावर येऊन थांबल्या… मलायका हिने अनेक सिनेमांसाठी आयटम सॉग्न केले आहे. ज्यासाठी अभिनेत्री मोठं मानधन देखील घेतलं. आता ‘पॉयजन बेबी’ गाण्यासाठी देखील मलायका हिने कोट्यवधी रुपये घेतले आहेत.
‘पॉयजन बेबी’ हे गाणं 3 मिनिटं 2 सेकंडसाठी मलायका हिने मोठी रक्कम घेतली आहे. ‘थामा’ सिनेमातील ‘पॉयजन बेबी’ गाणं प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना देखील गाणं प्रदर्शित झालं आहे. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांत असंख्य लोकांनी लाईक आणि शेअर केलं आहे.
या गाण्यात मलायका अरोराने तिच्या 2 मिनिटांच्या परफॉर्मेंसने सर्वांचं मन जिंकलं. या गाण्याला जास्मिन सँडल्सने आपला आवाज दिला आहे. या गाण्यात जास्मिनसोबत दिव्या कुमार आणि सचिन-जिगर देखील आहेत. मलायका हिच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीने तीन मिनिटांसाठी 2 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
अनेक वर्षांनंतर मलायकाने भन्नाट आयटम सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सांगायचं झालं तर, मलायका हिने सिनेमांमध्ये अभिनय केला नाही. पण डान्समुळे मलायका अधिक चर्चेत असते. आतापर्यंत मलायका हिने अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग दिले आहेत.
कधी प्रदर्शित होणार ‘थामा’?
हॉरर ‘थामा’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चेत आहे.. सिनेमात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. आता चाहते ट्रेलरच्या प्रतीक्षेत असते. सिनेमा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर 21 ऑक्टोबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
