Divorce : सर्वांना खुश करायला मी काही पिझ्झा नाही..; घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली, समोर आलं कटू सत्य
Divorce : सर्वांना खुश करायला मी काही पिझ्झा नाही..., घटस्फोटानंरत दुसऱ्या लग्नाबद्दल विचाताच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच म्हणाली. एवढंच नाही तर, 'ज्या नात्यात आनंद, आत्मविश्वास आणि महत्त्व मिळणार नाही, अशा नात्यात राहून काय फायदा...', असं देखील अभिनेत्री म्हणाली.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी घटस्फोट झाल्यानंतर दुसरं लग्न केलं नाही तर, एकट्याच राहण्याचा निर्णय घेतला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री शेफाली शाह.. शेफाली हिने हिने हिट सिनेमांमध्ये काम केलं. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेकदा चढ – उतारांचा सामना करावा लगला. शेफाली हिने ‘द ऑडैसिटी ऑफ बीइंग’ (The Audacity of Being) या पुस्तकात स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहे. शिवाय पहिल्या घटस्फोटाबद्दल देखील सांगितलं आहे. शेफाली हिचं लग्न अभिनेता हर्ष छाया (Harsh Chhaya) याच्यासोबत झालेलं. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, हर्ष याच्यासोबत अपयशी ठरलेलं लग्न आणि वैवाहिक आयुष्याबद्दल शेफाली हिने सांगितलं आहे. लग्न मोडून एकटं राहण्याचा निर्णय अभिनेत्रीने कसा घेतला यावर मोठं वक्तव्य केलं आहे. पुस्तकात शेफाली हिने पहिल्या लग्नातील दिवस आठवत सांगितलं, आयुष्यात कोणीच घडस्फोटासारख्या गोष्टींसाठी आधीपासून तयार नसतं… प्रत्येक लग्न आपल्याला हवं तसं नसतं…त्यानंतर व्यक्ती जे आहे त्याचा स्वीकार करण्यापेक्षा दुसरा मार्ग निवडतो…
का घेतला पहिलं लग्न मोडल्याचा
एका मित्राने शेफाली हिला विचारलं होतं, ‘जर दुसरं प्रेम भेटलं नाही तर, तू ही रिस्क घेणार आहेस?’ यावर शेफाली स्पष्टच म्हणाली, ‘अशा परिस्थितीत मी एकटीच राहणं निवडेल, पण अशा नात्यात राहणार नाही, ज्यामध्ये आनंद, आत्मविश्वास आणि महत्त्व मिळणार नाही.’ याच विचाराने शेफाली हिने एकटं राहण्याचा बोल्ड निर्णय घेतला. पुढे शेफाली म्हणाली, ‘प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात व्यक्ती स्वतःपूर्ण थकून जातो. मला कळून चुकलं आहे की, सर्वांना खुश करायला मी काही पिझ्झा नाही.’
पुस्तकात दडलंय अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्याचं गुपित
पहिलं लग्न आणि घटस्फोटाव्यतिरिक्त, शेफालीच्या या पुस्तकात अनेक वैयक्तिक विषयांचा समावेश आहे. यात प्रेमाची वेदना, दुसरं लग्न, मैत्री, वाढत्या वयानुसार बॉलिवूडमधील काम, बॉडी इमेज आणि मुलांचा सांभाळ यांसारख्या मुद्द्यांवरही कोणतीही लपवाछपवी न करता मोकळेपणाने भाष्य करण्यात आलं आहे.