
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने काही दिवस डेट केल्यानंतर जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षीचे भाऊ या लग्नाला उपस्थित नसल्याने विविध चर्चा या रंगताना दिसल्या. सोनाक्षीचे आई वडील दोघेही या लग्नात उपस्थित होते. सोनाक्षी स्वत:च्याच लग्नात धमाल मस्ती करताना दिसली. सोनाक्षी कायमच जहीर इक्बाल याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मागील काही दिवसांपासून सतत एक चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे की, सोनाक्षी प्रेग्नंट असून बाळाला जन्म देणार आहे. मात्र, या अफवा असल्याचे सांगताना सोनाक्षी दिसली. सोनाक्षीने आता लग्नानंतर पहिल्यांदाच जहीर इक्बाल याच्या कुटुंबियांबद्दल मोठा खुलासा केला.
सोनाक्षी सिन्हा कॉमेडियन भारती सिंह हिच्या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी ती पहिल्यांदाच असे जाहिरपणे झहीर इक्बालच्या कुटुंबियांबद्दल बोलताना दिसली. सोनाक्षी सिन्हाने म्हटले की, आम्ही एकत्र सुट्टी घालवण्यास जातो आणि सर्वजण मस्त मजा करतो. मला लग्नाच्या अगोदरच जहीरने विचारले होते की, तुला वेगळे राहायचे आहे का? मी त्यावेळी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. मी त्याला म्हटले की, मी तुझ्या कुटुंबियांसोबत राहिल.
तुला वेगळे राहायचे तर राहा. मी अजिबातच जेवण तयार करत नाही. हा… पण माझी आई खूप जास्त छान जेवण बनवते. माझ्या आईला कायम एक चिंता असायची की, मला जेवण बनवता येत नाही. विशेष म्हणजे माझ्या सासूबाईंना देखील जेवण बनवता येत नाही आणि त्या कायमच मला म्हणतात की, तू बरोबर घरात आलीस. मला खाण्याची प्रचंड आवड आहे पण स्वयंपाक करण्याची अजिबातच नाही.
पहिल्यांदाच आपल्या सासूबद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा दिसली आहे. सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या पहिल्या दिवसापासून जहीर इक्बाल याच्या कुटुंबियांसोबत राहते. झहीरच्या कुटुंबाचे वातावरण नेमके कसे आहे हे सांगताना सोनाक्षी सिन्हा दिसली आहे. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची पहिली भेट सलमान खानच्या घरी झाली होती. पहिल्याच भेटीमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली.