Sushant Singh Rajput याच्या आठवणीत आजही ढसा-ढसा रडतात ‘या’ अभिनेत्री

Sushant Singh Rajput | 'या' अभिनेत्रीच्या आयुष्यात आजही सुशांत सिंह राजपूत याच्यासाठी खास स्थान, अभिनेत्याला निधनाला अनेक वर्ष झाल्यानंतर देखील अभिनेत्री व्यक्त करतात दुःख... सध्या सर्वत्र सुशांत सिंह राजपूत याची चर्चा, कोण आहेत त्या अभिनेत्री?

Sushant Singh Rajput याच्या आठवणीत आजही ढसा-ढसा रडतात या अभिनेत्री
| Updated on: Oct 02, 2023 | 2:15 PM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने फक्त छोट्या पडद्यावर नाही तर रुपेरी पडद्यावर देखील स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. आजही असे काही सेलिब्रेटी आहेत जे सुशांत सिंग राजपूत याला विसरू शकलेले नाहीत. बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री आजही आशा आहेत ज्यांच्या आयुष्यात सुशांत सिंग राजपूत याच्यासाठी खास स्थान आहे. अभिनेत्याच्या निधनाला अनेक वर्ष झाल्यानंतर देखील अभिनेत्री त्याला विसरू शकल्या नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यासाठी दुःख व्यक्त करताना दिसतात. तर आज अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्या सुशांत सिंग राजपूत याच्या आठवणीत आजही आहेत…

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने अनेक वाईट प्रसंगांचा सामना केल्यानंतर आयुष्याला पुन्हा सुरुवात केली असली तरी अनेक महत्त्वाच्या दिवशी तिला सुशांत याची आठवण येत असते. सुशांत सिंग राजपूत यांच्या सोबत असलेल्या नात्यामुळे रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती. आता रिया तिचं खासगी आयु्ष्या आनंदाने जगत आहे.

अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून सारा अली खान हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोघांची केमिस्ट्री देखील चहात्यांना प्रचंड आवडली. अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक महत्त्वाच्या दिवशी सारा सुशांत याची आठवण काढताना दिसते

अभिनेत्री क्रिती सेनन ही देखील कायम सुशांत सिंग राजपूत याची आठवण काढत असते. एक काळ असा होता जेव्हा क्रिती आणि सुशांत यांच्या नात्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. आज सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाला अनेक वर्ष लोटली आहेत पण तरी देखील कृती अभिनेत्याला विसरू शकलेली नाही.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून दोघे चहात्यांच्या भेटीस आले. फक्त रील लाईफ मध्येच नाही तर रियल लाईफमध्ये देखील दोघांची जोडी चहात्यांना प्रचंड आवडली. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट देखील केलं. पण त्यांचं नातं लग्न पर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला

अभिनेत्री दिशा पाटणी हिने एम एस धोनी या सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा दिशा आणि सुशांत सिंग राजपूत यांची सिनेमातील केमिस्ट्री चहात्यांना प्रचंड आवडली. तेव्हा चहा त्यांनी दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. एम एस धोनी सिनेमाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हा सोशल मीडियावर अभिनेत्रीने सुशांत सिंग राजपूत याच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली.