Love Life | धर्मेंद्र नाही तर ‘या’ मुलासोबत झालं असतं हेमा मालिनी यांचं लग्न, एका अटीमुळे स्वप्न भंग
Love Life | धर्मेंद्र यांच्या आधी फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्यावर जडला होता हेमा मालिनी यांचा जीव, 'त्या' घटनेनंतर बहरलं प्रेम, पण नाही पोहचू शकलं लग्नापर्यंत... सध्या सर्वत्र फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक चिमुकला सैनिकांप्रमाणे तयार झालेला दिसत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्याने जवळपास १०० सिनेमांमध्ये काम केलं. त्यामधील काही सिनेमे असे होते, ज्यामुळे बॉलिवूडच्या इतिहासात अभिनेत्याचं नाव सोनेरी अक्षणारी लिहिण्यात आलं. महत्त्वाची गोष्ट पहिल्या सिनेमात अभिनेत्याची भूमिका फक्त २ मिनिटांची होती. पण त्या दोन मिनिटांमध्ये अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘शोले’ सिनेमात आपले दोन्ही हात गमावलेल्या ठाकूरची भूमिका साकारून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.
सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत ते दुसरे तिसरे कोणीही नसून अभिनेते संजीव कुमार आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लहानपनीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. संजीव कुमार यांनी ‘हम हिंदुस्तानी’ सिनेमातून करियरची सुरुवात केली. सिनेमात त्यांची भूमिका फक्त 2 मिनिटांची होती. पण या सिनेमानंतर अनेक संधी संजीव कुमार यांना मिळाल्या.
संजीव कुमार यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव फार मोठं केलं. पण ते त्यांचं स्टारडम अनुभवू शकले नाहीत. १९८५ मध्ये वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी संजीव कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. संजीव कुमार यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांच्या जोडीची चर्चा तुफान रंगली..
संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांनी ‘सीता और गीता’ सिनेमात एकत्र काम केलं. सिनेमातील ‘हवा के साथ साथ’ हे गाणं दोघांवर चित्रित करण्यात आलं होतं. जे सुपरहिट ठरलं. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान दोघांचा अपघात झाला, त्यादरम्यान त्यांना स्वतःपेक्षा एकमेकांची जास्त काळजी वाटू लागली. अखेर काळजीचं रुपांतर प्रेमात झालं.
संजीव यांना हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करायचं होतं. लेखक हनिफ झवेरी आणि सुमंत बत्रा यांनीही त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. हेमा जेव्हा जेव्हा संजीव यांच्या आईला भेटायच्या तेव्हा ती डोकं झाकायच्या. मात्र, दोघांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
संजीव कुमार आयुष्यभर राहिले अविवाहित
संजीव कुमार यांना अशी पत्नी हवी होती जी, घरी राहून आईची सेवा करेल, पण हेमाने त्यावेळी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. हेमापासून विभक्त झाल्यानंतर संजीव कुमार यांनी कधीही लग्नाचा विचारा केला नाही. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलं आणि सिनेमांमध्ये काम करणं सुरुच ठेवलं.
