हार्ट सर्जरी होताना कशी झालेली सुष्मिताची अवस्था… म्हणाली, बेशुद्ध झाली असती तर…

Sushmita Sen on Heart Surgery : हार्ट सर्जरी होताना सुष्मिताने डॉक्टरांना काय सांगितलं होतं, कशी होती अभिनेत्री अवस्था, म्हणाली, 'बेशुद्ध झाली असती तर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिताच्या वक्तव्याची चर्चा...

हार्ट सर्जरी होताना कशी झालेली सुष्मिताची अवस्था... म्हणाली, बेशुद्ध झाली असती तर...
Sushmita Sen
| Updated on: Nov 17, 2025 | 12:22 PM

Sushmita Sen on Heart Surgery : बॉलिवूडची लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री सष्मिता सेन हिला फब्रुवारी 2023 मध्ये ‘आर्या 3’ सीरिजच्या शुटिंग दरम्यान हृदय विकाराचा झटक आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता हिच्या धमन्यांमध्ये 95 % ब्लॉकेज होते. ज्यामुळे अभिनेत्रीची हार्ट सर्जरी करण्यात आली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, प्रकृती खालावल्यनंतर अभिनेत्रीची कशी अवस्था होती. याबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. शिवाय हार्ट सर्जरी झाली तेव्हा सुष्मिताल हिला बेशुद्ध करण्यात आलं नव्हतं. त्यामागे देखील मोठं कारण आहे.

पॉडकास्टमध्ये सुष्मिता सेन म्हणाली, ‘माझे सर्व डॉक्टर तुम्हाला सांगतिल की, त्यावेळी मी प्रचंड धैर्यवान होती. मी स्पष्ट सांगितलं होतं की, मला बेशुद्ध करू नका, कारण सर्व प्रक्रिया मला माझ्या डोळ्यांनी पाहायती होती. माझ्यातील मला बेशुद्ध व्हायला आवडत नाही. म्हणूनच मी हृदयविकाराच्या झटक्यातून वाचली, कारण तो सहन करणे आणि जाणीवपूर्वक राहणे, किंवा बेशुद्ध होऊन झोपी जाणे आणि कधीही जागे न होणे यापैकी एक पर्याय होता.’

 

 

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘हार्ट सर्जरी सुरु असताना मला शुद्धीत राहायचं होतं. वेदनेला कमी करण्यासाठी मी तयार नव्हती.. मला सर्वकाही सहन करायचं होतं… त्या वेळेत मी डॉक्टरांसोबत बोलत होती… लवकर माझ्यावर उपचार करा. असं मी त्यांना सतत सांगत होती. कारण मला सेटवर पुन्हा जायचं होतं.’

‘जेव्हा तुमची मुख्य भूमिका असते, तेव्हा तुमच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असते. तुमच्यावर 500 लोकांची जबाबदारी असते. माझ्यासोबत जे काम करत होते, त्यांची रोजची मजुरी थांबली होती. कारण शुटिंग बंद होती… याची मला भीती होती… त्यामुळे मला लवकरात लवकर बरं व्हायचं होतं… बरं होण्यासाठी मला 15 दिवस लागले… तेव्हा मला ‘आर्या’ सीरिजची शुटिंग करण्याची परवानगी मिळाली..’

सांगायचं झालं तर, सुष्मिता हिच्या ‘आर्या’ सीरिजचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोलबाला पाहयला मिळाला. 2023 मध्ये ‘आर्या 3’ सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा दुसरा पार्ट 2024 मध्ये प्रदर्शित झालेला. सुष्मिता हिचे अनेक सिनेमे आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात.