AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मला भीती होती फहाद अहमद…

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. स्वरा भास्करची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. स्वरा भास्करने मोठा खुलासा केलाय. स्वरा भास्कर हिच्याकडून नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय. स्वराने तिच्या लग्नाबद्दल हा खुलासा केलाय.

स्वरा भास्कर हिचा हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मला भीती होती फहाद अहमद...
Swara Bhaskar
| Updated on: Sep 23, 2024 | 7:26 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.  स्वरा भास्करची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले. ज्यावेळी स्वराने फहाद अहमदसोबत लग्न केले, त्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला. स्वराने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. स्वरा आणि फहाद अहमद यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. स्वरा सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना स्वरा दिसते.

आता नुकताच स्वरा भास्कर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये ती पहिल्यांदाच तिच्या आणि फहादच्या नात्याबद्दल बोलताना दिलीये. स्वरा भास्कर म्हणाली की, माझी आणि फहादची पहिली भेट ही मुंबईमध्ये एका आंदोलनादरम्यान झाली. त्यानंतर आमच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. स्वरा पुढे म्हणाली, आम्हाला कधीच वाटत नव्हते की आमच्यामध्ये काही होऊ शकते.

कारण माझ्या आणि फहादच्या अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. मात्र, त्यावेळी आमच्या आजूबाजुच्या लोकांना वाटत होते की, या दोघांमध्ये काहीतरी आहे. एक वेळ अशीही आली होती की, मला समाजाची भीती वाटत होती. मुळात म्हणजे मी एक अशी व्यक्ती आहे मला लोक काय बोलतील , याचा अजिबातच फरक पडत नाही. पण त्यावेळी माझ्यासोबत काय घडत होते हे मला देखील कळत नव्हते.

मी त्यावेळी विचार करत होते की, माझे कुटुंबिय आणि माझे मित्र काय बोलतील. हेच नाही तर मला या गोष्टीची भीती वाटत होती की, फहाद अहमदसोबत लग्न केले तर मला बॉलिवूडवाले लोक पार्ट्यांना नाही बोलवणार. मी धर्म आणि जात मानणाऱ्यांपैकी नाही पण त्यावेळी असंख्य गोष्टी माझ्या मनात सुरू होत्या. काय सुरू आहे हेच कळत नव्हते.

पहिल्यांदाच फहाद अहमदसोबत लग्न करण्याच्या अगोदर काय घडत होते हे सांगताना स्वरा भास्कर ही दिसली आहे. स्वरा भास्कर ही फहादसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. डिलीवरीनंतर आयुष्य कसे बदलले हे सांगताना काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर ही दिसली. स्वरा भास्कर हिने फहाद अहमदसोबत अगोदर कोर्टात लग्न केले.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन