Video : Urfi Javed बिकिनी घालून चाफ्याच्या शोधात, नेटकरी म्हणतात “तुला फुलांची नाही, कपड्यांची गरज”

| Updated on: Mar 26, 2022 | 1:49 PM

Urfi javed Video : उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने असाच एक व्हीडिओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट पहायला मिळत आहेत.

Video : Urfi Javed बिकिनी घालून चाफ्याच्या शोधात, नेटकरी म्हणतात तुला फुलांची नाही, कपड्यांची गरज
उर्फी जावेद
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांना तिचा लूक खूप आवडतो. परंतु, त्यामुळे अनेकदा तिला प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. उर्फीने पुन्हा एकदा तिचा अशाच बोल्ड ड्रेसमधील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला आहेत. यावर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट पहायला मिळत आहेत. काहींनी जाळाच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर काहींनी तिच्या सौंदर्याची तारिफ केली आहे. काही नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. “तुला फुलाची नाही, कपड्यांची गरज”, असं हा नेटकरी म्हणाला आहे. तर आणखी काहींनी तिला अश्याच प्रकारे ट्रोल केलं आहे.

उर्फीचा व्हीडिओ
उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात ती ब्लॅक कलरची बिकनी घालून चाफ्याचं फुल तोडताना दिसत आहे.फुल तोडताना तिचा तोलही जातोय. शिवाय खाली येऊन ती फुल डोक्यात लावतानाही दिसत आहे. तिच्या या व्हीडिओला 97 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या व्हीडिओला तिने “I’m a rose that came from concrete!”, असं कॅप्शनही दिलं आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
काही लोकांना तिचा ड्रेस खूप आवडलाय. तर काहींना अजिबात आवडला नाही. त्यांनी उर्फीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.”तुला फुलाची नाही, कपड्यांची गरज”, असं हा नेटकरी म्हणाला आहे.

दुसरा नेटकरी म्हणलाय “ही मुलगी फेमस होण्यासाठी काहीही करू शकते.” तिसरा म्हणतो, “भारतात वेड्या लोकांची कमी नाहीये.” आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तू किती घाणेरडी दिसतेयस.’ “तुला चांगले कपडे मिळत नाहीत का?”, असं एकाने म्हटलंय. दरम्यान, उर्फी जावेदने एका मुलाखतीदरम्यान ट्रोलिंगला भीक घालत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या

RRR Movie First Day Collection : आरआरआरची पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई,’The Kashmir Files’लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!

Iqbal Singh Chahal यांच्या भावाची Sonu Nigam ला धमकी?, अमित साटम यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित, चहल म्हणतात “माझा काहीही संबंध नाही!”

थिएटरमध्ये काम करून महिन्याकाठी हातात 300 रूपये यायचे, त्याच थिएटरमध्ये Prakash raj ‘सुपर व्हिलन’ झाले, वाचा प्रेरणादायी कहानी…