AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRR Movie First Day Collection : आरआरआरची पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई,’The Kashmir Files’लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!

आरआरआर या सिनेमाने प्रदर्शनाच्या झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय.

RRR Movie First Day Collection : आरआरआरची पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई,'The Kashmir Files'लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!
आरआरआर सिनेमा
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 26, 2022 | 2:13 PM
Share

मुंबई : एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांचा सुपरडुपर हिट सिनेमा आरआरआरने (RRR Movie) प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. परदेशातही या सिनेमाने आपली जादू कायम ठेवली आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्येही या सिनेमाने कोट्यावधींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने भारतात 18 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई ‘द काश्मीर फाईल्स’पेक्षा खूप जास्त आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ने (The Kashmir Files) पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती. तर आरआरआरने परदेशातही छप्पर तोड कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने 26.46 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये 2.40 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवलाय. दरम्यान या सिनेमात एनटीआर राम चरण (NTR Ram Charan) आलिया भट (Alia Bhatt) अजय देनगन (Ajay Devgn) हे कलाकार पहायला मिळतात.

कोट्यावधींचा गल्ला

आरआरआर या सिनेमाने प्रदर्शनाच्या झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 18 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई कश्मिर फाईल्सपेक्षा खूप जास्त आहे. द काश्मीर फाईल्सने पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती. तर आरआरआरने परदेशातही छप्पर तोड कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने 26.46 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये 2.40 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवलाय.

चित्रपटाची कथा

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेत राम हा पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतो, तर दुसरीकडे भीम हा अत्यंत साधा माणूस आहे. आग आणि पाणी या संकल्पनेवर या दोन व्यक्तीरेखा पडद्यावर फुलवल्या आहेत. राम हा आगीसारखा तापट, जिद्दी, शक्तीशाली आहे. ज्याच्या कामावर एकीकडे ब्रिटीश खूशही असतात आणि दुसरीकडे त्याच्या शक्तीशाली व्यक्तिमत्त्वाकडे पाहून भयभीतही होतात. भीम हा अत्यंत ताकदवान आहे, पण त्याच्या ताकदीचा वापर जेव्हा गरज असते, तेव्हाच तो करतो. लेडी स्कॉट ही स्वत:च्या स्वार्थासाठी मल्ली नावाच्या एका मुलीला तिच्या आई आणि कुटुंबापासून दूर नेते. तिला सोडवण्यासाठी भीम दिल्लीला येतो आणि तिथेच राम त्याला भेटतो. या दोघांची मैत्री कशी होते, मल्लीला सोडवण्यात भीमला यश मिळेल का, हे तुम्हाला चित्रपटात पहायला मिळेल. मात्र गोष्ट फक्त एवढीच नाही. यात अनेक ट्विस्ट आहेत, ड्रामा आहे, भरभरून अॅक्शन आहे, डान्स आहे, थोडीफार कॉमेडीही आहे. राजामौलींचा हा चित्रपट म्हणजे ‘फुल पॅकेज’ आहे.

संबंधित बातम्या

Iqbal Singh Chahal यांच्या भावाची Sonu Nigam ला धमकी?, अमित साटम यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित, चहल म्हणतात “माझा काहीही संबंध नाही!”

थिएटरमध्ये काम करून महिन्याकाठी हातात 300 रूपये यायचे, त्याच थिएटरमध्ये Prakash raj ‘सुपर व्हिलन’ झाले, वाचा प्रेरणादायी कहानी…

Prakash Raj: सिंघममधल्या ‘जयकांत शिक्रे’नं वयाने 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी केलं लग्न; लग्नापूर्वी घेतली मुलींची परवानगी

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...