Drug Connection | एनसीबीची मोठी कारवाई, ड्रग तस्करासह एका टीव्ही अभिनेत्रीला अटक!

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

Drug Connection | एनसीबीची मोठी कारवाई, ड्रग तस्करासह एका टीव्ही अभिनेत्रीला अटक!

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी अनेक मोठी नावे समोर आली आहेत. यापैकी बऱ्याच जणांना समन्स पाठवून एनसीबीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. आता एनसीबीने आणखी एका ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतले आहे. या ड्रग्ज तस्करासोबत (Drug Peddler) मालिकाविश्वातली एक प्रसिद्ध अभिनेत्रीसुद्धा (TV Actress) एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याचा दावा केला जात आहे.( Bollywood drug connection NCB Arrest drug peddler with TV actress)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि आणखी 21 जणांना अटक केली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर यांचीही नावे समोर आल्याने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

याच प्रकरणात एनसीबीला आणखी एका ड्रग तस्कराबाबत कुणकुण लागल्याने त्यांनी साध्या वेशात मुंबईतल्या वर्सोवा भागात सापळा रचला होता. एनसीबीच्या या सापळ्यात पाच जण अडकले आहेत. तर, एका टीव्ही अभिनेत्रीला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या अभिनेत्रीला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. एनसीबीची ही धडक कारवाई अद्याप सुरूच आहे. (Bollywood drug connection NCB Arrest drug peddler with TV actress)

अर्जुन रामपालच्या मेहुण्याला अटक

एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले. ड्रग्ज कनेक्शन तपासादरम्यान नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. शिवाय त्याचाकडून ‘हॅश’ आणि ‘अल्प्राझोलम’ हे ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले आहेत. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(Bollywood drug connection NCB Arrest drug peddler with TV actress)

‘सावधान इंडिया’च्या दिग्दर्शकाची चौकशी

अ‍ॅगिसिलोस याच्या चौकशीत ‘सावधान इंडिया’चा सोहेल कोहलीचे नाव समोर आले. त्यामुळे एनसीबीने सोहेल याची देखील चौकशी केली आहे. सोहेल याच्यावर ड्रग्जचे वितरण करणे आणि सेवन करणे असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने एनसीबीकडून चौकशी त्याची करण्यात आली आहे. तब्बल सहा तास त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे.

(Bollywood drug connection NCB Arrest drug peddler with TV actress)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *