Mahesh Bhatt : आलिया भट्टच्या ट्रोलिंगच्या मुद्यावरुन महेश भट्ट प्रत्येक पालकाने एकदा विचार करावं असं बोलले

Mahesh Bhatt : महेश भट्ट हे बॉलिवूड मधलं एक मोठ नाव आहे. त्यांच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. महेश भट्ट यांच्या चित्रपटांमधून त्यांचं वेगळेपण दिसून येतं. महेश भट्ट वयात आलेल्या मुलांच्या पालकत्वाबद्दल विचार करायला भाग पाडणारं बोलले आहेत.

Mahesh Bhatt : आलिया भट्टच्या ट्रोलिंगच्या मुद्यावरुन महेश भट्ट प्रत्येक पालकाने एकदा विचार करावं असं बोलले
Alia Bhatt-Mahesh Bhatt
Image Credit source: instagram
| Updated on: Jul 03, 2026 | 4:18 PM

बॉलिवूड मधल्या मोठ्या नावांमध्ये महेश भट्ट यांचा समावेश होतो. त्यांनी बनवलेल्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांवर एक छाप सोडली. त्यामुळेच एक वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून सार्वजनिक जीवनात महेश भट्ट यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आहेत. त्यांच्या काही चित्रपटांचं कौतुक झालं, काहींवर टीका झाली. महेश भट्ट यांच्या काही वक्तव्यांवरुन वादविवादही झालेत. प्रसिद्धी बरोबर तुम्ही लोकांच्या नजरेत येता, त्यावर महेश भट्ट बोलले. महेश भट्ट त्यांची मुलगी आलिया भट्ट बद्दल बोलले. आलियाच्या बऱ्याच गोष्टींशी सोशल मीडियावर चर्चा होते. तिला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. महेश भट्ट म्हणाले की, ‘या सगळ्याचा त्यांनी कसा सामना करावा हे मी मुलांना शिकवत नाही. ते त्यांचा, त्यांचा विषय हाताळतात’

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना, मी मुलांना सल्ला देणं टाळतो असं महेश भट्ट म्हणाले. प्रसिद्धीचा दबाव आणि वयात आलेल्या मुलांच्या पालकत्वाच्या विषयावरही महेश भट्ट बोलले. “मी माझ्या मुलांना सल्ला देत नाही. ते माझ्यापेक्षा हुशार आहेत. आजच्या जमान्यातली मुलं आहेत ती, स्वत: शिकतील. परिस्थिती त्यांना शिकवले. परिस्थितीच शिक्षक आहे. तुमचा शिक्षक हे आयुष्यच आहे” असं महेश भट्ट बोलले. “माझी मुलं जेव्हा टीकेचा सामना करतात तेव्हा मी त्यांची ढाल बनत नाही. मी जर त्यांचा बचाव केला, त्यांना पाठिशी घातलं तर ती अपंग बनतील. त्यांना यश आणि चटके दोन्ही सोसू दे” असं महेश भट्ट बोलले.

मी मुलांना माझ्या आयुष्याचे अनुभव सांगत नाही, कारण..

टीका आणि ऑनलाइन ट्रोलिंग हा प्रिसद्धी बरोबर येणारा व्यावसायिक धोका असल्याचं महेश भट्ट यांनी सांगितलं. “प्रसिद्धीची एक किंमत असते. तुम्ही सूर्यासमोर उभे राहिलात तर तुम्हाला चटके सुद्धा बसणार” असं महेश भट्ट म्हणाले. स्वत:चे अनुभव मुलांसोबत का शेअर करत नाही, यावर महेश भट्ट बोलले की, “आयुष्यच एक शिक्षक आहे. मी मुलांना माझ्या आयुष्याचे अनुभव सांगत नाही. ते योग्य नाही. त्यांचं आयुष्य वेगळं आहे. आता वेळ बदलेली आहे. त्यांचा प्रवास वेगळा आहे”

Follow Us