AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 वर्षे सुरु होतं या चित्रपटाचं शूटिंग, अनेक कलाकारांचा झालेला मृत्यू, आता 54 वर्षानंतर पुन्हा प्रदर्शित होतोय चित्रपट

14 वर्षांनंतर प्रदर्शित झाला हा चित्रपट. अनेक घडामोडींमुळे शूटिंगमध्ये अडथळे आल्यामुळे अनेक दिवस सुरु होतं या चित्रपटाचं शूटिंग, अनेक कलाकारांचं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच झालेलं निधन. आता 54 वर्षानंतर पुन्हा होतोय प्रदर्शित.

14 वर्षे सुरु होतं या चित्रपटाचं शूटिंग, अनेक कलाकारांचा झालेला मृत्यू, आता 54 वर्षानंतर पुन्हा प्रदर्शित होतोय चित्रपट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 03, 2026 | 3:06 PM
Share

हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पाकीजा’ला आता नव्या रूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर आणलं जाणार आहे. दिग्दर्शक कमाल अमरोही आणि अभिनेत्री मीना कुमारी यांच्या कारकिर्दीतील हा ऐतिहासिक चित्रपट तब्बल 54 वर्षांनंतर 4K रेस्टोरेशनच्या माध्यमातून पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. फिल्म हेरिटेज फाउंडेशनने सुमारे दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर चित्रपटाचं रेस्टोरेशन पूर्ण केलं आहे.

‘पाकीजा’च्या भव्य प्रीमियरची आठवण आजही सिनेरसिकांच्या मनात आहे. सुमारे 54 वर्षांपूर्वी मुंबईतील मराठा मंदिरमध्ये चित्रपटाच्या रिळांना शाही पालखीतून आणण्यात आलं होतं. या ऐतिहासिक स्क्रीनिंगला दिग्दर्शक कमाल अमरोही, मीना कुमारी यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते.

15 वर्षांच्या संघर्षानंतर पडद्यावर

‘पाकीजा’ची निर्मितीची कहाणीही चित्रपटाइतकीच रंजक आणि संघर्षमय आहे. 1950 च्या दशकाच्या मध्यात या चित्रपटाची संकल्पना आकाराला आली. लखनौच्या नवाबी काळाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात मीना कुमारी यांनी साहिबजान या तवायफची भूमिका साकारली होती.

चित्रपटाचं शूटिंग 1956 मध्ये ब्लॅक अँड व्हाइटमध्ये सुरू झालं. त्यानंतर 1958 मध्ये चित्रपटाच्या निर्मितीने ईस्टमॅनकलरचा मार्ग स्वीकारला. कलाकारांमधील बदल, पटकथेतील फेरबदल, वाढत जाणारा खर्च आणि विविध अडचणींमुळे चित्रपटाचं काम वारंवार रखडलं. कमाल अमरोही यांच्या काटेकोर कामाच्या पद्धतीमुळेही ‘पाकीजा’ पूर्ण होण्यासाठी तब्बल 14 ते 15 वर्षांचा कालावधी लागला.

1964 मध्ये कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर चित्रपटाचं काम थांबलं. त्यानंतर मीना कुमारी यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. मात्र सुनील दत्त आणि नरगिस यांनी चित्रपटाचं जुनं फुटेज पाहिल्यानंतर मीना कुमारी यांना हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यानंतर ‘पाकीजा’ पुन्हा मार्गावर आला.

चित्रपटाच्या प्रवासात अनेक दिग्गज हरपले

‘पाकीजा’ पूर्ण होण्याच्या प्रदीर्घ प्रवासात चित्रपटाशी संबंधित अनेक दिग्गज कलाकार आणि तंत्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेले. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत म्हणजे 31 मार्च 1972 रोजी मीना कुमारी यांचं निधन झालं.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन