
चित्रपटसृष्टीत असे अनेकदा पाहिले गेले आहे की जेव्हा रील आणि रिअल लाईफ एकत्र येते तेव्हा नेहमी गोंधळ निर्माण होतो. बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री असो अनेक रील लाईफमधील बहिण भावाचा भूमिका केलेले किंवा मित्र-मैत्रिणीची भूनिका साकारलेले अभिनेते-अभिनेत्री रिअल लाईफमध्ये एकमेकांचे खरे जोडीदार बनले. पण बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाचा एक वेगळीच जोडी पाहायला मिळाली.
खऱ्या आयुष्यातील एका बहिण-भावाच्या जोडीने चित्रपटात म्हणजे रील लाईफमध्ये रोमान्स केला होता.पडद्यावर प्रियकर म्हणून प्रेम केलं होतं. त्यामुळे याला प्रचंड विरोध करण्यात आला होता. सगळ्या लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला होता.
खऱ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध
हा अभिनेता त्यावेळी सर्वात प्रसिद्ध अभिनेता होता. हा प्रसिद्ध विनोदी कलाकार म्हणजे मेहमूद. मेहमूद यांनी त्यांची स्वतःची बहीण मीनू मुमताजसोबत एका चित्रपटात प्रियकराची भूमिका केली होती.
सर्वांनाच वाटलं आश्चर्य
खरंतर, मीनू आणि मेहमूद यांनी ‘हावडा ब्रिज’ चित्रपटात एकत्र काम केले होतं. मेहमूद आधीच या चित्रपटात काम करत होता. दोघांनीही ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘गोरा रंग चुनरिया कली’ या गाण्यात परफॉर्म केले होतं.
भावासोबत नाईलाजास्तव काम करावं लागलं
मीनू आणि तिचे कुटुंब त्यावेळी आर्थिक संकटाचा सामना करत होते. मीनूवर कुटुंबाची जबाबदारी होती, म्हणून मीनूने पैशासाठी आणि घराच्या जबाबदारीसाठी ही भूमिका स्वीकारली.
लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला
एका भावा-बहिणीला पडद्यावर रोमान्स करताना पाहून लोक खूप संतापले होते. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला आणि अशा कास्टिंगच्या नैतिकतेवर आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मीनूने याबद्दल काय स्पष्टीकरण दिले होते
गोंधळ पाहून मीनूने नंतर सांगितले की तिने ही भूमिका फक्त पैशांसाठी केली होती आणि ती कशी घेतली जाईल याची तिला कल्पना नव्हती.
लग्नानंतर परदेशात स्थायिक
या वादांनंतर हळूहळू सगळं ठीक झालं. त्यानंतर मीनूने अनेक चित्रपटांमध्ये कामही केलं. याच दरम्यान मीनूने एका दिग्दर्शकाशी लग्न केलं आणि ती परदेशात निघून केली गेली. लग्नानंतर कॅनडामध्ये ते कायमचे स्थायिक झाले आणि चित्रपटांपासून स्वत:ला दूर केले.
ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला
2003 मध्ये मीनू मुमताजची प्रकृती बिघडली होती आणि त्यांची स्मरणशक्ती कमी होऊ लागली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की त्यांना ब्रेन ट्यूमर आहे जो 15 वर्षांपासून लक्षात न आल्याने वाढत होता. त्यानंतर 2021 मध्ये मीनू यांचे निधन झाले.