Sonu Nigam : एका रात्रीत सोनू निगमने कमावले 3.70 कोटी रुपये, मोठ्या डीलचा गायकाला फायदा

Sonu Nigam : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील मोठ्या डीलमुळ सोनू निगम चर्चेत आला आहे. या डीलमागे गायकाने 3.70 कोटींची कमाई केली आहे.

Sonu Nigam : एका रात्रीत सोनू निगमने कमावले 3.70 कोटी रुपये, मोठ्या डीलचा गायकाला फायदा
Sonu Nigam
| Updated on: Sep 13, 2026 | 8:14 AM

Sonu Nigam : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम सध्या त्याच्या प्रॉपर्टीमुळे चर्चेत आला आहे. गायकाने ऑफिस विकून 3.70 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी गायक कैलाश खैर यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील स्वतःच्या आलिशान ऑफिस विकला. आता सोनू निग याने देखील त्याच परिसरातील आपल्या ऑफिसच्या जागेबाबत एक मोठा व्यवहार केला असून, गायकाने तीन वर्षांपूर्वी 18 कोटी रुपयांना खरेदी केलेलं ऑफिस विकल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवहारातून गायकाला 3.70 कोटी रुपयांचा नफा झाला.

सोनू निगम याने विकलं स्वतःचं ऑफिस

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सोनू निगमच्या मालकीची अनेक आलिशान मालमत्ता आहे. मुंबईतील बीकेसी (BKC) परिसरातील हा ऑफिस स्पेस ही त्याच्या अशाच आलिशान मालमत्तांपैकी एक होती. ‘सीआरई मॅट्रिक्स’ (CRE Matrix) कडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू निगमने हे ऑफिस 2023 मध्ये खरेदी केलं होतं आणि आता तीन वर्षांनंतर ते विकलं आहे.

सोनू निगम यांना 3.70 कोटी रुपयांचा नफा झाला

प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट्सनुसार, सोनू निगम याने ही जाहा 2023 मध्ये ही जागा 14/.30 कोटी रुपयांना खरेदी केली होती. तीन वर्षांच्या आत ती विकून त्याला 3.5 कोटी रुपयांहून अधिक नफा मिळाला. ही जागा 18 कोटी रुपयांच्या चांगल्या किमतीला विकली गेली. हा व्यवहार 4 सप्टेंबर 2026 रोजी झाला. सोनूचं ऑफिस ‘ट्रेड सेंटर’ नावाच्या इमारतीच्या तळमजल्यावर होतं. सोनूने ही मालमत्ता ‘SAA Estate LLP’ ला विकली आहे. कागदपत्रांनुसार, या करारासाठी 1.08 कोटी रुपयांचं स्टॅम्प ड्युटी भरण्यात आलं.

किती श्रीमंत आहे सोनू निगम?

सोनू निगम याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘संदेशे आते हैं’, ‘अब मुझे रात दिन’, ‘अभी मुझ में कहीं’, ‘सूरज हुआ मद्धम’, ‘कल हो ना हो’, ‘सब कुछ भुला दिया’ यांसरख्या गाण्यांना आवाज देत सोनू निगम याने बॉलिवूडमध्ये एका काळ गाजवला. सोनू निगम एका गाण्यासाठी 15 ते 18 लाख रुपये घेतो आणि एका कॉन्सर्टसाठी 55 ते 1 कोटी रुपये चार्च करतो. समोर येत असलेल्या माहितीनुसार, गायकाची नेटवर्थ 350 ते 400 कोटी रुपये आहे. बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत गायकांच्या यादीत सोनू निगम अव्वल स्थानी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us