दिवाळीत प्रत्येकजण ऐकतो सलमान-सोनम कपूरचं हे गाणं, 11 वर्षांपासून प्रचंड क्रेझ, आजही लोक..
गेल्या 11 वर्षांपासून सोनम कपूर-सलमान खानचं हे गाणं दिवाळीमध्ये सोशल मीडियावर प्रत्येकजण ऐकतो. आतापर्यंत या गाण्यावर बनलेत लाखो रील्स. तुम्ही ऐकलं का?

दिवाळी म्हटलं की घरात रोषणाई, आकाशकंदील, पणत्या आणि फटाक्यांची आतषबाजी यासोबतच सणाचा आनंद वाढवणारी गाणीही आलीच. दिवाळीच्या काळात अनेक जुनी आणि लोकप्रिय गाणी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतात. असंच एक रोमँटिक गाणं सध्या दिवाळीच्या आठवणींना उजाळा देत आहे. हे गाणं म्हणजे अभिनेता सलमान खान आणि सोनम कपूर यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील ‘जलते दीये’.
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. मात्र, चित्रपटातील गाणी आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. सूरज बडजात्या यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. दिवाळीच्या वातावरणाला साजेसं असलेलं ‘जलते दीये’ हे गाणं आजही प्रेक्षकांसाठी खास आहे.
सलमान-सोनमचा रोमँटिक अंदाज
‘जलते दीये’ या गाण्यात सलमान खान आणि सोनम कपूर यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. दिव्यांच्या रोषणाईत दोघांचा रोमँटिक अंदाज, भव्य सेट, सुंदर लोकेशन्स आणि पारंपरिक भारतीय वेशभूषा यामुळे गाण्याला एक वेगळीच आकर्षकता मिळाली आहे. प्रेम, सौंदर्य आणि भारतीय सणांची संस्कृती यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळतो. त्यामुळे दिवाळीच्या खास प्रसंगी हे गाणं ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
चार गायकांनी दिला आवाज
या गाण्याला शबाब साबरी, अन्वेषा, विनीत सिंह आणि हर्षदीप कौर यांनी आपला आवाज दिला आहे. प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने या गाण्याचं संगीत तयार केलं असून, इर्शाद कामिल यांनी त्याचे सुंदर शब्द लिहिले आहेत. गाण्याची रोमँटिक धून आणि प्रेम व्यक्त करणारे बोल यामुळे ते आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
11 वर्षांनंतरही गाण्याची लोकप्रियता कायम
‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 11 वर्षे झाली आहेत. तरीही या चित्रपटातील गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. विशेषतः दिवाळीच्या काळात ‘जलते दीये’ गाणं पुन्हा चर्चेत येतं. दिव्यांच्या प्रकाशात प्रेमाचा सुंदर अनुभव देणारं हे गाणं सणाच्या आनंदात आणखी भर घालतं. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतही हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळत आहे.