इतकं रोमँटिक गाणं की 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, 32 वर्षांपासून सुपरहिट, प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं

32 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर, रोमँटिक आणि सुपरहिट गाणं, जे ऐकताच प्रत्येकजण गाण्यात गुंतून राहतो. एकदा नाही तर 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन. इतकी क्रेझ की बस स्टॉप, रेडिओ, टीव्हीवर सतत ऐकायचे लोक.

इतकं रोमँटिक गाणं की 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, 32 वर्षांपासून सुपरहिट, प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतं
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 08, 2026 | 2:05 PM

बॉलिवूडच्या चित्रपटांमधील गाण्यांना प्रेक्षकांच्या मनात कायमच एक खास स्थान आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन कित्येक वर्षे उलटली तरी काही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. विशेषतः 90 च्या दशकातील गाण्यांची क्रेझ आजही कमी झालेली नाही. या काळातील प्रेमगीतांनी अनेकांच्या आठवणींना उजाळा दिला असून आजच्या पिढीलाही ही गाणी तितकीच आवडतात.

90 च्या दशकातील अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मोहरा’ चित्रपटातील ‘ना कजरे की धार’. प्रेम, विरह आणि भावनांना सुरेल स्पर्श करणाऱ्या या गाण्याने त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं होतं. एक काळ असा होता की, गाड्यांपासून सलूनपर्यंत आणि रेडिओपासून टीव्हीपर्यंत सर्वत्र या गाण्याचीच धूम ऐकायला मिळत होती.

पंकज उधास आणि साधना सरगम यांच्या आवाजाची जादू

‘ना कजरे की धार’ या गाण्याला प्रसिद्ध गायक पंकज उधास आणि साधना सरगम यांनी आपला आवाज दिला आहे. या गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार इंदीवर यांनी लिहिले असून, विजू शाह यांनी त्याला संगीत दिले आहे. गाण्याच्या शब्दांमधील प्रेमाची भावना आणि त्याला मिळालेली सुरेल चाल यामुळे हे गाणं अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालं.

गाण्याची खासियत म्हणजे त्यातील साधेपणा आणि भावनिक गोडवा. त्यामुळेच हे गाणं ऐकताना आजही 90 च्या दशकातील तो काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. प्रेमात असणाऱ्या अनेकांसाठी हे गाणं त्यावेळी खास होतं आणि आजही जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी हे गाणं आवर्जून ऐकलं जातं.

तीन दशकांनंतरही लोकप्रियता कायम

गाण्याला कितीही वर्षे झाली तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही, हेच ‘ना कजरे की धार’च्या बाबतीत पाहायला मिळतं. आजच्या काळात नवीन गाण्यांची संख्या मोठी असली तरी ९०च्या दशकातील या गाण्याची मोहिनी अजूनही कायम आहे.

पंकज उधास आणि साधना सरगम यांचा भावपूर्ण आवाज, इंदीवर यांचे सुंदर शब्द आणि विजू शाह यांचे श्रवणीय संगीत यामुळे ‘ना कजरे की धार’ हे 90 च्या दशकातील एक सदाबहार प्रेमगीत ठरलं आहे. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दशकांहून अधिक काळ उलटला असला तरी हे गाणं आजही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये तितक्याच मानाने स्थान मिळवतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us