Rani Mukharjee : अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक, 75 व्या वर्षी कृष्णा मुखर्जी यांचं निधन
Rani Mukerji's Mother Passed Away : अभिनेत्री राणी मुखर्जी हिची आई कृष्णा मुखर्दी यांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांनी प्रायव्हसीची विनंती केली आहे,

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukharjee) हिच्या आईचं निधन झालं. कृष्णा मुखर्जी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यश राज फिल्म्सने मंगळवार 22 सप्टेंबर रोजी या दु:खद वृत्ताला दुजोरा दिला. या शोकाकुल क्षणी कुटुंबियांच्या प्रायव्हसीचा आदर राखावा अशी विनंती करण्यात आली आहे. राणी मुखर्जीच्या आीचन निधन कशामुळे झालं, ते कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
यश राज फिल्म्सने निवेदनात काय म्हटलं ?
यश राज फिल्म्सने एक निवेदन जारी केलं आहे. ” अत्यंत दुःखद अंतःकरणाने आम्ही ही माहिती देत आहोत की, राणी मुखर्जी यांच्या आई, 75 वर्षीय श्रीमती कृष्णा मुखर्जी यांचे आज दुपारी निधन झाले. कुटुंबीय तुमच्या प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल अत्यंत आभारी आहेत. या दुःखाच्या प्रसंगी कृपया कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, ही नम्र विनंती.” असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.
आईसोबतच्या नात्याबद्दल अनेकदा बोलली राणी
अभिनेत्री राणी मुखर्जी अनकेदा, तिच्या आईसोबत असलेल्या अतिशय जवळच्या नात्याबद्दल बोलली होती. Mrs. Chatterjee vs Norway या चित्रपटातील राणीच्या भूमिकेसाठी तिची आई कृष्णा या देखील एक महत्त्वाच्या प्रेरणास्रोत होत्या. या चित्रपटात राणीने आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी लढणाऱ्या एका बंगाली आईची भूमिका साकारली होती. 2023 मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान राणीने सांगितलं होतं की, या वास्तविक घटनेशी संबंधित संदर्भांचा तिने बराच अभ्यास केला होता; मात्र तिच्या भूमिकेतील बराचसा भाग, अनेक बारकावे जे तिने साकारले त्याची प्रेरणा तिने आईकडून घेतली होती.
आईकडून घेतली ताकद
” एक अभिनेत्री म्हणून मला या व्यक्तिरेखेबद्दल माझा स्वतःचा दृष्टिकोन मांडायचा होता. पण मला या भूमिकेवर खूप जास्त संदर्भांचं ओझं नको होतं. ज्यांच्यावर हा चित्रपट आधारित होता तया वास्तविक व्यक्ती आणि माझ्या भूमिके लोकांनी साम्य शोधावं, असंही मला वाटत नव्हतं” अस राणी तेव्हा म्हणाली होती.
” अशीमाकडे, सागरिका यांच्या अनेक रेकॉर्ड केलेल्या टेप्स होत्या आणि संदर्भांसाठी मी त्या पाहिल्या. पण या व्यक्तिरेखेचा उर्वरित भाग जो होता, तो प्रत्यक्षात माझ्या आईवर आधारित आहे. माझ्या माहितीत माझ्या आई इतकी बंगाली संस्कृतीशी जोडलेली व्यक्ती दुसरी कोणी नाही, असं राणी म्हणाली. मग ती आम्हाला स्वतःच्या हाताने जेवण भरवण्याची पद्धत असो किंवा आमच्या कपाळावर टीका लावणं असो… मी माझ्या आईकडूनच या भूमिकेसाठी ताकद आणि प्रेरणा घेतली” असंही राणीने नमूद केलं होतं.
कृष्णा मुखर्जी या आधी पार्श्वगायिका होत्या. त्यांचा विवाह चित्रपट निर्माते राम मुखर्जी यांच्याशी झाला. राम मुखर्जी हे फिल्मालय स्टुडिओजच्या सहसंस्थापकांपैकी एक होते. 2017 साली राम मुखर्जी यांचं निधन झालं.