Bollywood During Coronavirus Lockdown | लॉकडाऊनदरम्यान बॉलिवूडमधील 10 मोठ्या घटना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे (Bollywood top 10 news During Coronavirus Lockdown). लॉकडाऊनदरम्यान गेल्या दोन महिन्यात संपूर्ण देशाने अनेक अनपेक्षित गोष्टी बघितल्या

Bollywood During Coronavirus Lockdown | लॉकडाऊनदरम्यान बॉलिवूडमधील 10 मोठ्या घटना
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 9:11 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे (Bollywood top 10 news During Coronavirus Lockdown). लॉकडाऊनदरम्यान गेल्या दोन महिन्यात संपूर्ण देशाने अनेक अनपेक्षित गोष्टी बघितल्या. याशिवाय लोकांनी अनेक गोष्टींचा पहिल्यांदा अनुभव घेतला. लॉकडाऊनदरम्यान गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडमध्येही अनेक उतारचढाव आले (Bollywood top 10 news During Coronavirus Lockdown).

1. इरफान खानचं निधन

लॉकडाऊनदरम्यान बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचं 29 एप्रिल रोजी वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान इरफान यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन वर्षांपासून ते न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होते. त्यांच्या जाण्याने बोलीवूडवर शोककळा पसरली.

2. ऋषी कपूर यांचं निधन

इरफान यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

3. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूरनंतर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने अवघं बॉलिवूड हादरलं आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करत स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने आज (14 जून) वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

4. दोन टीव्ही कलाकारांची आत्महत्या

हिंदी टीव्ही स्टार मनमीत ग्रेवाल याने एप्रिल महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली. 32 वर्षीय मनमीत ग्रेवाल हा लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. कर्जात बुडाल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

‘क्राइम पेट्रोल’ मालिकेतील अभिनेत्री प्रेक्षा मेहताने 27 मे 2020 रोजी गळफास लावून आत्महत्या केली. प्रेक्षाने मध्यप्रदेशच्या इंदूर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.

5. कलाकारांना कोरोनाची लागण

अभिनेत्री जोआ मोरानी, तिचा भाऊ शाजा मोरानी आणि वडील करीम मोरानी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मार्च महिन्यात समोर आली. त्यानंतर मे महिन्यात ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या सर्वांनी काही दिवसांनी कोरोनार मातही केली. याशिवाय एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गायिका कनिका कपूरलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अखेर उपचारानंतर तिचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला.

6. अभिनेता कार्तिक आर्यनने शेअर केलेला व्हिडीओ वादात

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या बहिणीसोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत बहिणीने चपाती चांगली बनवली नाही म्हणून आर्यन आपल्या बहिणीला ओरडत असल्याचं समोर आलं होतं. हा व्हिडीओ काहींनी थट्टा-मस्करीत घेतला. तर काहींनी या व्हिडीओवरुन कार्तिकवर सडकून टीका केली. अखेर कार्तिकने तो सोशल मीडियावरुन काढून टाकला.

7. नवाजुद्दीन सिद्दकीच्या पत्नीची घटस्फोटाची मागणी

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीची पत्नी आलिया सिद्दकीने गेल्या महिन्यात आपल्या पतीकडून छळ होत असल्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली. आलियाने नवाजुद्दीनच्या कुटुंबियांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे नवाजुद्दीनचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत आलं.

8. अभिनेत्री झायरा वासीमचं ट्विटवरुन वाद

अभिनेत्री झायरा वासीम हीने 27 मे रोजी केलेल्या ट्विटमुळे ती ट्रोल झाली. ट्रोलिंग इतकं वाढलं की तिने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील अकाउंट बंद केले.

9. अमेरिकेतील वर्णभेदविरोधातील आंदोलनात प्रियंका चोप्राचा सहभाग

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत पोलिसांनी जॉज फ्लॉईड नावाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीला अमानुष मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेत वर्णभेदाविरोधात मोठं आंदोलन सुरु झालं. या आंदोलनात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासदेखील सहभागी झाली.

10. अभिनेता राणा दग्गूबातीचा साखरपुडा

लॉकडाऊनदरम्यान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गूबातीने आपल्या प्रेयसी मिहीकासोबत साखरपुडा केला. या साखरपुड्याची माहिती स्वत: राण दग्गूबातीने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन दिली. लॉकडाऊन असल्यामुळे दग्गूबाती याने इतरांना साखरपुड्यासाठी आमंत्रण दिले नव्हते. या दरम्यान फक्त राणा आणि मिहीकाच्या कुटुंबातली लोकं उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.