AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan Kiran Rao Divorce : शाही घराण्यातील मुलगी ते मिस्टर परफेक्शनिस्टची पत्नी; वाचा किरण रावची कहाणी

किरण राव ही शाही कुटुंबातील आहे. तिचे आजोबा वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी हे तेलंगणा राज्यात आहे. किरण ही आदिती राव हैदरीची बहीण आहे. आदितीही शाही कुटुंबातील आहे. (Aamir Khan Kiran Rao Divorce: Daughter of the Royal Family to Mr. Perfectionist's Wife; Read Kiran Rao's story)

Aamir Khan Kiran Rao Divorce : शाही घराण्यातील मुलगी ते मिस्टर परफेक्शनिस्टची पत्नी; वाचा किरण रावची कहाणी
| Edited By: VN | Updated on: Jul 03, 2021 | 1:07 PM
Share

मुंबई : लग्नाच्या 15 वर्षानंतर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan Kiran Rao Divorce) आणि किरण राव यांनी विभक्त होण्याची घोषणा केली. आमिर आणि किरण यांनी एक संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. दोघांनीही आपल्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करू इच्छित असल्याचं त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. मात्र, पती-पत्नी म्हणून नाही तर पालक आणि कुटुंब म्हणून एकमेकांसोबत राहणार असंही त्यांनी म्हटलं आहे. आता या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानं चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण एकेकाळी आमिर खाननं किरण रावसाठी पहिली पत्नी रीना दत्तापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

चाहत्यांना प्रश्न पडला आहे की दोघांमध्ये असं काय घडलं ज्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आमिर खान आणि किरण राव यांच्या या घटस्फोटामुळे त्यांची प्रेमकथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे की दोघांची प्रेमकहानी कशी सुरू झाली आणि मग हे नाते लग्नापर्यंत कसं पोहोचलं.

आमिर खान-किरण राव यांची पहिली भेट

किरण राव आणि आमिर खानची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. किरणच्या आधी आमिर खाननं रीना दत्ताशी लग्न केलं होतं. मात्र, रीना आणि आमिर खानचा 2002 मध्ये घटस्फोट झाला. ज्यानंतर किरणच्या रूपानं आमिर खानला त्याचं दुसरं प्रेम मिळालं. आमिर खाननं स्वत: किरण रावसोबतच्या आपल्या प्रेमकथेविषयी खुलासा केला होता.

लग्नापुर्वी दीड वर्षे सोबत

एका मुलाखतीत आमिर खानने सांगितले होते – ‘2001 मध्ये मी लगान चित्रपट करत असताना मी किरणला भेटलो. तेव्हा ती असिस्टंट डायरेक्टर होती. त्यावेळी आमच्यात काही संबंध नव्हता. मात्र, घटस्फोटानंतर मी पुन्हा तिला भेटलो. एक दिवस मला तिचा फोन आला आणि आम्ही अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी तिच्यासोबत बोलताना खूप आनंदीत होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटू लागलो. लग्नाआधी आम्ही जवळपास दीड वर्षे एकत्र राहिलो आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.’

किरण शाही कुटुंबातील

किरण राव ही शाही कुटुंबातील आहे. तिचे आजोबा वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी हे तेलंगणा राज्यात आहे. किरण ही आदिती राव हैदरीची बहीण आहे. आदितीही शाही कुटुंबातील आहे.

2005 मध्ये दोघांचं लग्न

2005 मध्ये आमिर खाननं किरण रावशी लग्न केलं होतं. दोघांनाही एक मुलगा आहे. ज्याचे नाव आझाद आहे. किरण बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माती आहे. तिने सिक्रेट सुपरस्टार, पीपली लाईव्ह, दंगल, तलाश आणि जाने तू या जाने ना … अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र, लग्नाच्या 15 वर्षानंतर आता दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. ज्यामुळे दोघांचे चाहते खूप दु:खी झाले आहेत.

संबंधित बातम्या

Aamir Khan Kiran Rao Divorce: घटस्फोट शेवट नव्हे, नवी सुरुवात, आमिर खान-किरण रावचं पत्र जसंच्या तसं!

Aamir Khan Kiran Rao Divorce : वेगळे झालो असलो तरी ‘या’ कामासाठी एकत्रच राहणार, आमिर-किरण रावचं मोठं पाऊल

Aamir Khan Kiran Rao Divorce : पंधरा वर्षांचं नातं संपुष्टात !, अभिनेता आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?