Aamir Khan Kiran Rao Divorce : वेगळे झालो असलो तरी ‘या’ कामासाठी एकत्रच राहणार, आमिर-किरण रावचं मोठं पाऊल

आमिर खान आणि किरण राव यांनी संयुक्त निवेदन जारी करत घटस्फोटाच्या निर्णयाविषयी माहिती दिली. लग्नाच्या 15 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोटाचा निर्ण घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण मंनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे (Bollywood Actor Aamir Khan And Wife Kiran Rao Taking Mutual Divorce)

Aamir Khan Kiran Rao Divorce : वेगळे झालो असलो तरी 'या' कामासाठी एकत्रच राहणार, आमिर-किरण रावचं मोठं पाऊल
Amir Khan Kiran Rao Getting Divorce

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अर्थातच आमिर खान (Amir Khan) आणि दिग्दर्शक, निर्माती पत्नी किरण राव (Kiran Rao) या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी संयुक्त निवेदन जारी करत या निर्णयाविषयी माहिती दिली. लग्नाच्या 15 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोटाचा निर्ण घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण मंनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे (Bollywood Actor Aamir Khan And Wife Kiran Rao Taking Mutual Divorce)

“वेगळे झालो असलो तरी ‘या’ कामासाठी एकत्रच राहणार”

आमिर खान आणि किरण राव यांनी “आम्ही जीवनातील नवीन अध्याय सुरु करत आहोत. आता आम्ही पती पत्नी न राहता संयुक्त पालक आणि कुटुंब म्हणून एकत्र राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे” एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबात ट्विट केलं आहे.

आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. “गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

संयुक्त निवेदनात म्हटल्याप्रमाणे आमिर खान आणि किरण राव आझादचा संयुक्तपणे सांभाळ करणार आहेत. आझादचे संगोपन आणि पालनपोषण आम्ही एकत्रच करू, असे आमिर आणि किरण रावने म्हटले आहे.

2005 मध्ये विवाहबंधनात

‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता. आमिर खानला पहिली पत्नी रिया दत्तापासून दोन मुलं आहेत, आयरा खान आणि जुनैद खान.

Bollywood Actor Aamir Khan And Wife Kiran Rao Taking Mutual Divorce

संबंधित बातम्या :

Amir Khan Kiran Rao Divorce | अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

Amir Khan Kiran Rao Divorce: हा शेवट नव्हे तर सुरुवात; आमिर खान-किरण रावच्या मुलाचा ताबा आता कोणाकडे?

Aamir Khan Kiran Rao Divorce | पहिल्या पत्नीचं ‘ते’ पत्र वाचून ढसाढसा रडला आमिर खान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI