‘आदिपुरुष’च्या रिलीजनंतर प्रभास आणि क्रिती सेनॉन घेणार मोठा निर्णय

आदिपुरुषच्या सेटवर प्रभासने क्रितीला प्रपोज केल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजूनही क्रिती किंवा प्रभास यांनी त्यांचे रिलेशन जाहिर केले नाहीये

आदिपुरुषच्या रिलीजनंतर प्रभास आणि क्रिती सेनॉन घेणार मोठा निर्णय
| Updated on: Nov 29, 2022 | 4:00 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि प्रभास यांच्या अफेअरच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. आदिपुरुषच्या सेटवर प्रभासने क्रितीला प्रपोज केल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजूनही क्रिती किंवा प्रभास यांनी त्यांचे रिलेशन जाहिर केले नाहीये. आता नवीन एक बातमी येत असून आदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रभास आणि क्रिती हे साखरपुडा करणार आहेत. विशेष म्हणजे यांच्या रिलेशनशिपवर यांचे कुटुंबीय देखील खुश असल्याचे सांगितले जात आहे.

नुकताच एक शो झाला. या शोमध्ये क्रिती सेनॉनसोबत वरुण धवन देखील उपस्थित होता. यावेळी वरुण म्हणाला की, क्रितीचा दिल ज्याच्याकडे आहे तो सध्या मुंबईच्या बाहेर असून तो व्यक्ती दीपिकासोबत शूटिंग करत आहे.

सध्या अभिनेता प्रभास आणि दीपिका यांच्या आगामी एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असून ते मुंबई बाहेर आहेत. वरुणला नेमके कोणाचे नाव घ्यायचे होते, याचा सरळ सरळ अंदाजा चाहत्यांना आला.

सातत्याने क्रिती आणि प्रभास लवकरच साखरपुडा करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. क्रिती आणि प्रभासचे चाहते आता थेट यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत. परंतू क्रिती आणि प्रभास दोघेही आपल्या रिलेशनवर अजून काही बोलले नाहीयेत.

काही दिवसांपूर्वी क्रिती करण जोहरच्या एका शोमध्ये गेली होती. त्यावेळी तिने सर्वांसमोर प्रभासला काॅल केले होता. यावेळी करण प्रभासला बोलला देखील होता. तेंव्हापासूनच या दोघांच्या रिलेशनवर चर्चा होत आहेत.

आदिपुरुष या चित्रपटात क्रिती आणि प्रभास हे महत्वाच्या भूमिकेत आहेत. आदिपुरुष चित्रपटाचे टीझर रिलीज झाले असून या चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यानंतर मोठा हंगामा बघायला मिळाला होता. हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us