काजोलने दिवाळीचा फॅमिली फोटो केला शेअर, घरातील एक गोष्ट केली उघड!

बॉलीवूडची धमाल जोडी अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांच्या दोघांचे करीयर सध्या बूममध्ये आहे. यंदाच्या दिवाळीत दोघांच्या फिल्म रिलीज झाल्या आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी हटके असून त्यांची आपले मजेशीर फॅमिली फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.

काजोलने दिवाळीचा फॅमिली फोटो केला शेअर, घरातील एक गोष्ट केली उघड!
kajol ajay devgan family diwali photo
| Updated on: Nov 02, 2024 | 7:55 PM

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्री काजोल हीने सोशल मिडीयावर घरातील दिवाळी साजरा करतानाचे फोटो शेअर केलेले आहेत.या फोटोत काजोल सोबत पती अभिनेता अजय देवगन, मुलगा युग आणि मुलगी न्यासा ही देखील खोडकर अंदाजात पोझ देताना दिसत आहेत. काजोल हीने ग्रीन कलरची साडी घातलेली आहे.मुलगी न्यासा हीने पिवळसर रंगाचा सूट परिधान केलेला दिसत आहे. हे फोटो शेअर करताना काजोल हीने कॅप्शन अशी लिहीली आहे की प्रत्येक घरातील ही कहाणी वाटेल…

काजोल या दिवाळी मूडच्या फोटोला कॅप्शन मजेशीर लिहीलेली आहे. तिने लिहीलेय दिवाळी आमच्यातील नोक – झोक विना अधुरी आहे.म्हणजे चारचौघांसारखे आपल्याही घरात काही कुरबुरी सुरुच असतात. तशा आमच्या फॅमिलीतही आहेत अशा आशयाची कॅप्शन तिने लिहीलेली आहे. अर्थात देवगन कुटुंबातील दिवाळीत काही रुसवे आणि फुगवे सुरु आहेत असे तिला म्हणायचे नाही ना असे चाहते म्हणत आहेत. या फोटोसेशनमध्ये संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसत आहे. शेवटच्या दोन फोटोत काजोल आणि तिचा मुलगा युग यांच्या दरम्यानचे मजेशीर क्षण दिसत आहेत.

काजोल हीची पोस्ट येथे पाहा –

काजोल आणि फॅमिलीचे फोटो सोशल मिडीयावर सर्वांना आवडले आहे. युजर त्यांच्या फनी एक्सप्रेशनवर कमेंट करीत आहेत. अजय देवगन याला ही दिवाळी बंपर धमाक्याची आहे. कारण सिंघम अगेन दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला चांगले ओपनिंग मिळालेले आहे. तर काजोल हिची वेबसिरीज ‘दो पत्ती’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. काजोल सोबत ‘दो पत्ती’ या वेब सिरीजमध्ये कृति सेनॉन आहे.