मलायका अरोरा हिने आता चक्क ट्रोलर्सलाच केले ट्रोल, व्हिडीओ शेअर करत काढली मनातील भडास

मलायका आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

मलायका अरोरा हिने आता चक्क ट्रोलर्सलाच केले ट्रोल, व्हिडीओ शेअर करत काढली मनातील भडास
| Updated on: Nov 17, 2022 | 5:31 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच चर्चेत असते. मलायका तिच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देते. इतकेच नाही तर अनेकदा मलायका सोशल मीडियावर एकदम बोल्ड फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करते. सोशल मीडियावर मलायकाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. मलायका आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मलायकाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. आता तर मलायकाने चक्क ट्रोलर्सलाच ट्रोल केले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा बोलताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्यावर कशाप्रकारे टीका करून ट्रोल केले जाते हे सर्व सांगताना मलायका दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये मलायका म्हणते की, मी काहीही केले तरीही लोक मला कायमच ट्रोल करतात. इतकेच नाही तर हे सर्व करण्याचे तुमचे वय आहे का? असाही मला सातत्याने प्रश्न विचारून घरी बसण्याचा सल्ला दिला जातो, असे मलायका म्हणते.

मलायका अरोरा पुढे म्हणते की, माझा खूप जास्त मजाक उडवला जातो आणि मला ट्रोल केले जाते. विशेष म्हणजे ट्रोलर्सला माझा मजाक उडवण्यासाठी कोणतेही खास कारण देखील लागत नाही.

मग ते कपडे असो, माझा आणि अरबाजचा घटस्फोट असो, माझे रिलेशन असो, बिकिनी लूक असो किंवा इव्हनिंग गाऊन असो. प्रत्येक गोष्टीवर मला कायमच ट्रोल केले जाते.

इतकेच नाही तर मलायका पुढे म्हणाली की, अनेकदा मला माझ्या चालण्यावर देखील ट्रोल केले जाते. परंतू या सर्व गोष्टींना मी आता खरोखरच कंटाळले आहे. मलायका पुढे म्हणते की, यासर्व गोष्टीमुळे मी खूप जास्त बोर झाले आहे.

पुढे मलायका म्हणते की, मीच आता लोकांना असा काही विषय देणार आहे की, त्यावर ते विविध चर्चा करू शकतात. त्यांना माझ्याबद्दलचा एक वेगळा विषय मी देत आहे. ‘मूविंग इन विद मलाइका’ या शोचे प्रमोशन सध्या मलायका करत आहे.