Video | नको तिथेच बरोबर कट कसा?, नोरा फतेहीचा टॉप पाहून भडकले चाहते, पाहा व्हिडीओ…

बॉलिवूड अभिनेत्री डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. ती नेहमीच सुंदर फोटो आणि व्हिडीओंद्वारे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

Video | नको तिथेच बरोबर कट कसा?, नोरा फतेहीचा टॉप पाहून भडकले चाहते, पाहा व्हिडीओ...
Nora Fatehi

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. ती नेहमीच सुंदर फोटो आणि व्हिडीओंद्वारे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. ती तिच्या आकर्षक शैली, सुंदर परंतु आधुनिक प्रो-मॉडर्न ड्रेसिंग सेन्स आणि धमाकेदार नृत्य शैलीसाठी ओळखली जाते. मात्र, आता नोरा फतेही तिच्या बोल्ड टॉपमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. क्रॉप टॉपमुळे ती ट्रोलर्सला बळी पडली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने परिधान केलेल्या टॉपमुळे तिला बरेच काहीं ऐकून घ्यावे लागले आहे.

नोरा अलीकडेच एका व्हिडीओमध्ये विमानतळाबाहेर पडताना दिसली होती. या लूकमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. नोराने बोल्ड टॉप आणि ग्रे स्वेटपँट परिधान केली होती. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तिने सनग्लासेस घातलेले दिसत आहे. पण, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तिने स्वेटशर्ट काढला आणि हातात घेतला आणि वेगाने चालायला लागली. अशा स्थितीत त्याच्या टॉपचा विचित्र कट लोकांच्या डोळ्यासमोर आला.

पाहा व्हिडीओ…

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

लोकांनी केले ट्रोल

या व्हिडीओमध्ये या विचित्र कटमुळे नोराच्या शरीराचा काही भाग अतिशय विचित्र पद्धतीने दर्शनी झाला आहे. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये शेअर करण्यात आला आहे. आता त्याच्या कमेंट बॉक्समध्ये काही लोक नोरा आणि काही व्हिडीओ बनवणाऱ्या फोटोग्राफरला ट्रोल करत आहेत. कुणी म्हणतं की, स्लो मोशनमुळे तिचा पेहराव जास्त कुरूप दिसतोय, तर कुणी लिहिलंय की कॅमेरा पाहून स्वेटशर्ट काढण्याचं नेमकं प्रयोजन काय?

झपाट्याने वाढणारा करिअर आलेख

नोरा फतेहीच्या करिअरची सुरुवात ‘बिग बॉस’पासून झाली आणि त्या नंतर तिने अनेक गाण्यांमध्ये काम केले आहे. तिच्या ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ या गाण्यांनी बरीच चर्चा निर्माण केली आहे. नोराने नुकतेच ‘छोड देंगे’ आणि ‘कुसू कुसू’ या गाण्यात काम केले आहे. यापूर्वी ही अभिनेत्री ‘नाच मेरी रानी’ या गाण्यात दिसली होती. अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटातही नोरा दिसली होती.

हेही वाचा :

Bengaluru : पोलिसांची मुन्नवर फारुकीच्या स्टँडअप शोला परवानगी नाही, परवानगी नाकारल्यानंतर फारुकी म्हणाला…

हा ट्रॅप आहे यात अडकू नका… प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?

Priyanka chopra : matrix resurrections च्या नव्या व्हिडिओत प्रियंकाच्या अदांवर चाहते फिदा, हा हटके अंदाज पाहा


Published On - 10:41 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI