Bengaluru : पोलिसांची मुन्नवर फारुकीच्या स्टँडअप शोला परवानगी नाही, परवानगी नाकारल्यानंतर फारुकी म्हणाला…

मुन्नवरच्या शोला बंगळुरू पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतर तिरस्कार जिंकला, कलाकार हरला म्हणत मुन्नवर फारुकीने पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Bengaluru  : पोलिसांची मुन्नवर फारुकीच्या स्टँडअप शोला परवानगी नाही, परवानगी नाकारल्यानंतर फारुकी म्हणाला...
munawar faruqui
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 5:08 PM

स्टँडअप कॉमेडियन मुन्नवर फारुकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण मुन्नवरच्या शोला बंगळुरू पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतर मुन्नवर फारूकीने नाराजी व्यक्त केली आहे. फारुकीच्या शोमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते अशा आशयाचं पत्र पोलिसांनी ऑडीटोरिअमला लिहीत मुन्नवरच्या शोला विरोध दर्शवला आहे.

तिरस्कार जिंकला, कलाकार हरला

परवानगी नाकारल्यानंतर तिरस्कार जिंकला, कलाकार हरला म्हणत मुन्नवर फारुकीने पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे फारुकी पुन्हा एकदा जोरादार चर्चेत आला आहे. मुन्नवर फारुकी एक वादग्रस्त व्यक्ती आहे. कित्येक राज्यातील पोलिसांनी त्याच्या शोला बंदी घातली आहे. असं म्हणत पोलिसांनी त्याच्या शोला विरोध केलाय. मुन्नवरचा शो रविवारी 5 पाच वाजता बंगळुरूतील गुड शेफर्डमध्ये होणार होता. ‘डोंगरी टू नोव्हेयर’ अशा नावाच्या शोला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.

मुन्नवरच्या शोला हिंदू संघटनांचा विरोध

मुन्नवरच्या शोला अनेक हिंदू संघटनांनी विरोध दर्शवत पोलिसांना निवेदने दिली होती. त्यात श्रीराम सेना, हिंदू जनजागृती समिती अशा संघटनांसह इतरही काही संघटनांचा समावेश होता. मुन्नवर फारूकीवर मध्यप्रदेशातील एका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. तेव्हापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, आणि त्यावर बोट ठेवत फारूकीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते अशा आशयचं पत्र पोलिसांनी ऑडिटोरिअमला आणि आयोजकांना लिहीलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शो रद्द झाल्यानंतर फारुकीने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यात त्यानं आयोजकांना तोडफोडीच्या धमक्या आल्याचाही उल्लेख केला आहे. याआधीही कुणाल कामरा विरुद्ध भाजप, कुणाल कामरा विरुद्ध अर्णब गोस्वामी असा वाद पाहयला मिळाला आहे. त्यामुळे कॉमडियन वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे झाली, पण अनेकांना डायजेस्ट होत नाही; भुजबळांचा विरोधकांना टोला, मुख्यमंत्री बघेलांचा समता पुरस्काराने गौरव

आल्याचे पाणी आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे!

ख्रिस गेल घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणार? ‘युनिव्हर्स बॉस’कडून निवृत्तीचे संकेत

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.