AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आल्याचे पाणी आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे!

जेव्हा आपण भाजी घ्यायला जातो. तेव्हा सोबत आलेही घेतले पाहिजे. या थंडीच्या मोसमात आल्याचा चहा जवळपास सगळ्यांनाच आवडतो. आल्याचा चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आल्याचा चहा सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर ठरतो.

आल्याचे पाणी आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे!
खास पेय
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 4:11 PM
Share

मुंबई : जेव्हा आपण भाजी घ्यायला जातो. तेव्हा सोबत आलेही घेतले पाहिजे. या थंडीच्या मोसमात आल्याचा चहा जवळपास सगळ्यांनाच आवडतो. आल्याचा चहा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आल्याचा चहा सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर ठरतो. पण तुम्हाला माहित आहे का की आल्याचे पाणी पिणे देखील खूप फायदेशीर आहे आणि हे पाणी आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करते. जाणून घेऊया आल्याच्या पाण्याचे फायदे

-आल्याचे पाणी पिणे रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर आहे, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. आल्याचे पाणी त्वचेची चमक वाढवते. यासोबतच पिंपल्स आणि स्किन इन्फेक्शन सारख्या समस्यांपासून बचाव होतो. त्वचेत चमक हवी असेल तर आल्याच्या पाण्याचे सेवन करावे.

-आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील इतर समस्या दूर होतात. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन सारख्या आजारांची शक्यता कमी होते.

-आल्याचे पाणी पोटासाठी देखील फायदेशीर आहे. आल्याचे पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते आणि अन्न सहज पचण्यास मदत होते. याशिवाय जेवणाआधी आल्याचे तुकडे मीठ टाकून खाल्ल्याने लाळ वाढते, ज्यामुळे पचनास मदत होते आणि पोटाच्या समस्यांपासून बचाव होतो.

-जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर आल्याचे पाणी प्रभावी ठरेल. याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

-आल्यामध्ये असे घटक देखील आढळतात, जे कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी करण्यास मदत होते. याशिवाय आल्याच्या सेवनाने हृदयाच्या समस्यांवरही आराम मिळतो. आल्याचा उपयोग हृदयविकारांवर उपचार करण्यासाठी अनेक वर्षांपासून केला जातो.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...