खंडणी प्रकरणी नोरा फतेहीची पुन्हा होणार चौकशी, अभिनेत्रीच्या समस्या कमी होईना…

अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेही गुरुवारी सकाळी 11 वाजता कार्यालयात पोहोचेल. 200 कोटींहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीवर करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे.

खंडणी प्रकरणी नोरा फतेहीची पुन्हा होणार चौकशी, अभिनेत्रीच्या समस्या कमी होईना...
| Updated on: Sep 15, 2022 | 10:09 AM

मुंबई : सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी होणार आहे. नोरा फतेहीला ईडीने नोटीस बजावली असून आज सकाळी 11 वाजता नोराला चौकशीसाठी (Inquiry) ईडीच्या कार्यालयात दाखल व्हावे लागणार आहे. याचप्रकरणी काल दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिची चौकशी केली. जॅकलिनप्रमाणेच नोराचेही याप्रकरणात पाय खोलात असल्याची चर्चा आहे. सुकेश चंद्रशेखर आणि नोराचे अत्यंत जवळचे संबंध असल्याची देखील माहिती आहे.

नोरा फतेहीच्या अडचणींमध्ये अत्यंत मोठी वाढ

अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेही गुरुवारी सकाळी 11 वाजता कार्यालयात पोहोचेल. 200 कोटींहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीवर करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. ईडीच्या तपासात सर्व आरोपी सिध्द झाल्याचे देखील सांगितले जातंय. ईडीने सुकेश आणि नोरा यांना समोरासमोर बसवून मनी लाँड्रिंग अँगलची चौकशी केली.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणी नोराचे पाय खोलात

काल याचप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. जॅकलिननंतर आता नोराचीही आज चौकशी केली जाणार आहे. आता नोराची चौकशी किती वेळ चालणार हे बघण्यासारखे ठरणार आहे. सुकेश चंद्रशेखर आणि नोराची नेमकी कुठे, कधी आणि केंव्हा भेट झाली होती. यावर पोलिस नोराला प्रश्न विचारू शकतात. इतकेच नाही तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोराचा काय संबंध आहे, यावरही नोराची चौकशी होऊ शकते.