‘या’ बड्या नेत्याला बनवायचं होतं करीना कपूरला आपली बायको; तिच्या सौंदर्याने लावले होते वेड

एका बड्या नेत्याचे करीनावर प्रचंड प्रेम होते आणि त्यांनी तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या वडिलांनी या नातेसंबंधाला विरोध केला. त्यामुळे त्यांची ही प्रेमकहाणी अधुरी राहिली. एका मुलाखतीत स्वत: यावर भाष्य केलं होतं.

या बड्या नेत्याला बनवायचं होतं करीना कपूरला आपली बायको; तिच्या सौंदर्याने लावले होते वेड
| Updated on: Dec 15, 2024 | 5:50 PM

बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्री आणि अभिनेत्याचा वेगळा असा एक चाहता वर्ग आहे. काही वेळेला या चाहत्यांच्या वागण्यामुळे सेलिब्रेटी हैराण झालेले पाहायला मिळतात. या चाहत्यांमध्ये काही वेळेला अनेक राजकारणी पाहायला मिळतात. आणि काही जणांची मन जुळली की ते नात लग्नापर्यंतही जाते. जसं की परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची आधी छान मैत्री होती नंतर त्यांचे नाते हे लग्नापर्यंत गेलं. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी या दोघांनीही लग्न केलं.

परिणीती चोप्रा आणि राघव यांच्याप्रमाणे अजून एक जोडी आपल्याला पाहाला मिळाली असती जर ते नाते फुलले असते तर. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरवर एका बड्या नेत्याचे हृदय जडले होते. या नेत्याला करीना एवढी आवडायची की तिच्य़ाशी त्यांना लग्न करायचे होते.

करीनावर होते प्रचंड प्रेम

हे नेते म्हणजे यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव. एक काळ असा होता की अखिलेश यांना करीनावर इतके प्रेम होते की त्यांना तिच्याशी लग्न करायचे होते. जरी त्यांची पत्नी डिंपल स्वत: नायिकेपेक्षा कमी नसली तरी ते तेव्हा करीनाच्या सौंदर्यासाठी वेडे झाले होते. आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचं होतं.

राजकारणातील अखिलेश यादव हे छोटेसे नाव नाही. अखिलेशच्या कुटुंबात एकापेक्षा एक दिग्गज व्यक्ती आहेत. तसे, करीना कपूर म्हणजेच बेबोचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. पण या चाहत्याविषयी मात्र फार कोणालाही माहिती नव्हती. अखिलेश करीनाचे फक्त चाहते नव्हते तर त्यांचे प्रचंड प्रेमही त्यांच्यावर होते. पण त्यांचा हा लग्नाचा प्रस्ताव त्यांचे वडील मुलायमसिंह यादव यांना आवडला नाही.

“माझे वडील सहमत झाले असते तर…”

दरम्यान करीनाच्या लग्नाची बातमी समजताच अखिलेश यादव यांच्यासह लाखो लोक चकित झाले. अखिलेश यांचे करीना कपूरवरचे प्रेम तेव्हा उघड झाले जेव्हा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता.

जेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारले होते की तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे.? यावर अखिलेश यादव म्हणाले होते की, “माझी आवडती नायिका करीना कपूर आहे. जर माझे वडील सहमत झाले असते तर आज अभिनेत्रीचे नाव करीना कपूर खान नसून करीना कपूर यादव असे असते.” असं म्हटलं होतं. अखिलेश यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

अखिलेश यांची पत्नीही आहे खूप सुंदर 

तसेच अखिलेश झालेल्या चर्चेतून हे स्पष्ट झाले की ते करीनासाठी किती वेडे होते ते. पण त्यांची पत्नी डिंपल यादवही करीना कपूरपेक्षा कमी सुंदर नाही. डिंपल देखील खूप सुंदर आहे आणि तिला साधेपणाने जगायला आवडते. डिंपलचे एक नैसर्गिक सौंदर्य आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.