अक्षय कुमार याचा चित्रपट कार्तिक आर्यन याच्या फ्लॉप ‘शहजादा’च्या मागे, सेल्फीचा कमाईमध्ये निचांक

अक्षय कुमार याच्यासाठी 2022 हे वर्ष खास ठरले नव्हते. यावर्षात अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप गेले होते. दुसरीकडे कार्तिक आर्यन याचे चित्रपट हिट ठरले होते. मात्र, आता दोघांचेही चित्रपट फ्लाॅप गेले आहेत.

अक्षय कुमार याचा चित्रपट कार्तिक आर्यन याच्या फ्लॉप शहजादाच्या मागे, सेल्फीचा कमाईमध्ये निचांक
| Updated on: Feb 28, 2023 | 2:28 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या सेल्फी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. अक्षय कुमार याला बाॅलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखले जाते. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील एका एकमेव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षामध्ये तब्बल चार चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कायमच त्याच्या फिटनेसमुळेही चर्चेत राहणारा अभिनेता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर मार खाताना दिसत आहेत. याला शाहरूख खान आणि अजय देवगण यांचे चित्रपट अपवाद ठरले. पठाण चित्रपटानंतर रिलीज झालेले सेल्फी आणि शहजादा हे चित्रपट देखील फ्लाॅप गेले आहेत.

अक्षय कुमार याचा पाचवा फ्लाॅप जाणारा चित्रपट सेल्फी हा ठरला आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत होते. मात्र, तीन हिट चित्रपटांनंतर कार्तिक आर्यन याचा शहजादा देखील बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला आहे.

अक्षय कुमार याचा सेल्फी आणि कार्तिक आर्यन याचा शहजादा फ्लाॅप गेले आहेत. मात्र, अक्षय कुमार याच्या सेल्फीपेक्षा कार्तिक आर्यन याच्या शहजादाला चांगली कामगिरी करण्यात यश मिळाले आहे. कार्तिक आर्यनचा चित्रपट कमाईमध्ये अक्षय कुमार याच्या चित्रपटाच्या पुढे आहे.

सोमवारी कार्तिक आर्यन याच्या शहजादा या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर 1.82 कोटींचे कमाई केलीये. शहजादाने आतापर्यंत 28.56 कोटीचे कलेक्शन केले. रिलीज होऊन चार दिवसांमध्ये सेल्फी या चित्रपटाने 11.9 कोटींचे कलेक्शन केले आहे. रिपोर्टनुसार सेल्फी चित्रपटाचे बजेट हे 150 कोटी असल्याचे सांगण्यात येतंय.

बाॅक्स आॅफिसवर अक्षय कुमार याच्या चित्रपटाची जादू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट बघण्यापेक्षा चाहत्यांचा शहजादा चित्रपट बघण्याकडे कल जास्त आहे. 2023 मधील रिलीज होणारा सेल्फी हा पहिला चित्रपट अक्षय कुमार याचा आहे. म्हणूनच या चित्रपटांकडून प्रचंड अपेक्षा होत्या.

पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी केल्याने अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांचेही चित्रपट हिट ठरतील असे सांगितले जात होते. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पठाण चित्रपटाची जादू अजूनही बघायला मिळत आहेत.