The Kashmir Files समोर Akshay Kumarचीही जादू चालेना; जाणून घ्या ‘बच्चन पांडे’ची कमाई

| Updated on: Mar 20, 2022 | 1:24 PM

निर्माता साजिद नाडियादवाला आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हे समीकरण फार जुनं आहे. गेली दहा वर्षे निर्माता-अभिनेता म्हणून एकत्र आलेली ही जोडी पुन्हा एकदा 'बच्चन पांडे' (Bachchhan Paandey) या चित्रपटानिमित्त एकत्र आली आहे.

The Kashmir Files समोर Akshay Kumarचीही जादू चालेना; जाणून घ्या बच्चन पांडेची कमाई
Bachchhan Paandey
Image Credit source: Instagram
Follow us on

निर्माता साजिद नाडियादवाला आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) हे समीकरण फार जुनं आहे. गेली दहा वर्षे निर्माता-अभिनेता म्हणून एकत्र आलेली ही जोडी पुन्हा एकदा ‘बच्चन पांडे’ (Bachchhan Paandey) या चित्रपटानिमित्त एकत्र आली आहे. या चित्रपटाचं नाव जितकं अतरंगी आहे, तितकीच त्याची कथा आहे. विक्षिप्त व्यक्तीरेखा, त्यांची विचित्र नावं, ठासून भसलेला बॉलिवूड मसाला, कॉमेडी अशा सर्वांची झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. ‘बच्चन पांडे’ हा ‘जिगरथान्दा’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. अक्षय कुमार, क्रिती सनॉन, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्शद वारसी यांचा हा चित्रपट 18 मार्च रोजी प्रदर्शित झाला. बॉलिवूड मसालापट असला तरी या चित्रपटाला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा मोठा फटका बसतोय. मल्टिप्लेक्सेसमध्ये ‘बच्चन पांडे’ला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली. या चित्रपटाने दोन दिवसांत 25.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. (Box Office Collection)

पहिल्या वीकेंडला बच्चन पांडेच्या कमाईत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच ‘द काश्मीर फाईल्स’ची जादू अजूनही कायम असल्याचं दिसतंय. एकीकडे वीकेंडला द काश्मीर फाईल्सची कमाई वाढतेय, तर दुसरीकडे बच्चन पांडेची कमाई कमी होत आहे. पहिल्या दिवशी जवळपास 13 कोटी रुपये कमावल्यानंतर शनिवारी या चित्रपटाने 12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ आता 150 कोटींकडे वाटचाल करतोय. अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

बच्चन पांडेची कमाई-

शुक्रवार- 13.25 कोटी रुपये
शनिवार- 12 कोटी रुपये
एकूण- 25.25 कोटी रुपये

अक्षय कुमार हा विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध आहेच. ‘हाऊसफुल्ल’सारख्या चित्रपटांच्या निमित्ताने तो विनोदी भूमिकांमधून लोकांसमोर आला. मात्र विनोदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं पहायला मिळतंय. बच्चन पांडेमध्ये अक्षय गँगस्टरच्या तर क्रिती पत्रकाराच्या भूमिकेत आहे. 2002 मध्ये ‘जानी दुश्मन- एक अनोखी कहानी’ या चित्रपटात अक्षय आणि अर्शदने एकत्र काम केलं होतं. त्यानंतर हे दोघंही एकत्र असं कुठल्या चित्रपटांमध्ये दिसले नाही. आता बच्चन पांडेच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षांनी हे लोकप्रिय अभिनेते पुन्हा एकत्र आले.

हेही वाचा:

‘मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनावा, ते किटक नाहीत..’; The Kashmir Files वर IAS अधिकाऱ्याचं ट्विट चर्चेत

गोध्रा, जीएसटी, नोटाबंदीची आठवण करून देत प्रकाश राज यांचा टोला; The Kashmir Filesवर साधला निशाणा