आलिया भट्ट-रणबीर कपूर डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकणार? चित्रपटांचे चित्रीकरण ढकलले पुढे!

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघेही याच वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघेही गेल्या वर्षी लग्न करणार होते पण, कोरोना महामारीमुळे ते शक्य होऊ शकले नाही.

आलिया भट्ट-रणबीर कपूर डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकणार? चित्रपटांचे चित्रीकरण ढकलले पुढे!
Alia-Ranbir

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघेही याच वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघेही गेल्या वर्षी लग्न करणार होते पण, कोरोना महामारीमुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता हे दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत.

रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीर दीर्घ प्रतीक्षेनंतर यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीर इटलीमध्ये लग्न करणार आहेत, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र असतील.

नव्या चित्रपटाची शूटिंग पुढे ढकलले

‘ब्रह्मास्त्र’नंतर रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. पण आता रिपोर्ट्सनुसार, रणबीरने अॅनिमलचे शेड्यूल ‘जानेवारी 2022’पर्यंत पुढे ढकलले आहे. कारण, तो डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत परिणीती चोप्रा, अनिल कपूर, बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दुसरीकडे, आलिया भट्टबद्दल सांगायचे तर, ती नोव्हेंबरपासून कोणतेही नवीन काम सुरू करणार नाही. नोव्हेंबरनंतर नवीन वर्षापासून ती थेट कामाला सुरुवात करणार आहे.

विकी आणि कतरिनाचेही लग्न होणार!

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, आलिया आणि रणबीरच नाही तर विकी कौशल आणि कतरिना कैफही डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. ETimes च्या रिपोर्टनुसार, दोघांनी 18 ऑगस्ट रोजी ‘रोका’ केला होता आणि आता दोघेही त्यांच्या नात्याला पुढच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र, रोकाची बातमी समोर आल्यानंतर कतरिनाच्या टीमने ही अफवा असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी विकीनेही नुकतेच रोकाच्या बातमीवर मौन सोडले आहे.

ETimes च्या रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिनाने लग्नाची तयारी सुरू केली आहे. तिचे लग्नाचे कपडे सब्यसांचीने डिझाइन केले आहेत. सध्या तो लग्नाच्या कपड्यांसाठी फॅब्रिक निवडतोय. कतरिना तिच्या लग्नात सिल्कचा लेहेंगा घालणार आहे.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार जोडी

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. रणबीर-आलियाबरोबर अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट बर्‍याच वेळा पुढे ढकलला गेला आहे. चित्रपटाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडीओ अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.

कोरोना नसता, तर इतक्यात लग्न केलं असतं…

रणबीरने नुकत्याच एका वेबसाईटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आलियासोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. रणबीर म्हणाला की, ‘आम्ही दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र वेळ घालवला. दिवसभर मी चित्रपट आणि कार्यक्रम बघायचो, तर आलिया काहीतरी नवीन शिकत असायची.’ जेव्हा राजीव मसंदने रणबीरला लॉकडाऊनमध्ये कुठला ऑनलाईन क्लास घेतला आहेस का, असे विचारले तेव्हा रणबीर म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड आलिया जास्त काम करणारी आहे. तिने या काळात गिटार शिकण्यापासून ते पटकथालेखनापर्यंतचे सर्व ऑनलाईन क्लास केले. तिच्यासमोर मला नेहमीच अंडरअचिव्हर असल्यासारखं वाटत आहे. परंतु, मी या काळात कुठलाही ऑनलाईन क्लास केला नाही.

आलिया सोबतच्या लग्नाच्या प्लानबाबत विचारले असता रणबीर म्हणाला की, जर हा महामारीचा कालावधी आपल्या आयुष्यात आला नसता, तर आत्तापर्यंत आम्ही लग्न केले असते. मला माझ्या आयुष्यातील सगळी ध्येय लवकरात लकवर पूर्ण करायची आहेत.

हेही वाचा :

Katrina Kaif-Vicky Kaushal : कतरिना कैफ-विकी कौशल अडकणार लग्नबंधनात?; सब्यसाचीने डिझाइन केले लग्नाचे कपडे!

Sooryavanshi : ‘सूर्यवंशी’चे ‘मेरे यारा’ गाणे चाहत्यांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफ दिसले रोमँटिक अंदाजात!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI