Anushka Sharma | ‘निदान आतातरी तुमच्या घरातील बांधकामाचा आवाज बंद होईल…’, अनुष्काकडून कॅट-विकीला हटके शुभेच्छा!

Anushka Sharma | ‘निदान आतातरी तुमच्या घरातील बांधकामाचा आवाज बंद होईल...’, अनुष्काकडून कॅट-विकीला हटके शुभेच्छा!
Anushka sharma

अभिनेता विकी कौशल (Vickya Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, विकी आणि कतरिना लग्नानंतर अनुष्का आणि विराट कोहलीचे शेजारी बनू शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 10, 2021 | 10:57 AM

मुंबई : अभिनेता विकी कौशल (Vickya Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, विकी आणि कतरिना लग्नानंतर अनुष्का आणि विराट कोहलीचे शेजारी बनू शकतात. मात्र, आता अनुष्का शर्माने (Anushka Sharma) या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. अभिनेत्रीने पुष्टी केली आहे की, विकी आणि कतरिना तिचे नवीन शेजारी बनणार आहेत.

यापूर्वी अशी बातमी समोर आली होती की, कतरिना आणि विकीने सी-फेसिंग बिल्डिंगमध्ये एक अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे. याच इमारतीत अभिनेत्री अनुष्का तिचा पती-टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत राहते.

सिक्स सेन्स फोर्टमध्ये विकी-कतरिनाने घेतले सात फेरे!

विकी आणि कतरिनाने गुरुवारी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे सात फेरे घेतले. लग्नानंतर विकी आणि कतरिनाने त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री कतरिना आणि अनुष्कामध्ये चांगले बॉन्डिंग आहे.

अनुष्काच्या हटके शुभेच्छा!

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘दोन सुंदर लोकांचे अभिनंदन. तुम्हा दोघांना प्रेमाने भरलेले आयुष्य लाभो हीच सदिच्छा. तुम्ही अखेर लग्न केले याचा आनंद झाला, त्यामुळे आता तुम्ही तुमच्या घरात जाऊ शकता आणि आम्हाला येणारा बांधकामाचा आवाज आता निदान थांबू शकतो’. अनुष्का आणि कतरिनाने ‘जबतक है जान’ आणि ‘झिरो’मध्ये एकत्र काम केले आहे. या दोन्ही चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता.

सब्यसाचीने डिझाइन केला विकी आणि कतरिनाचा आऊटफिट!

या लग्न सोहळ्यात कतरिना कैफने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर विकीने ऑफ-व्हाइट शेरवानी घातली होती. दोघांनीही सब्यसाचीचे डिझाइन केलेले पोशाख परिधान केले होते. सब्यसाचीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सांगितले की, कतरिनाच्या लेहेंग्यात पंजाबी टच देण्यात आला आहे. त्याने सांगितले की अभिनेत्रीने तिच्या या पोशाखाश सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने घातले आहेत.

त्याच वेळी, विकी आणि कतरिनाबद्दल बोलायचे तर दोघांनी गुरुवारी कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये सात फेरे घेतले. 7 डिसेंबरपासून दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. या लग्नाला नेहा धुपिया, मिनी माथूर, गुरदास मान, शर्वरी वाघ यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचले होते. रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिना त्यांच्या मित्रांसाठी मुंबईत रिसेप्शन पार्टी देणार आहेत. यानंतर दोघेही हनिमूनसाठी मालदीवला जाऊ शकतात.

हेही वाचा :

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी-आणि कतरीना उद्याच हनीमूनला रवाना होणार, कुठे जाणार? वाचा सविस्तर

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : बॉलिवूडची सुपरस्टार जोडी अखेर लग्नबंधनात, विकी-कतरीनाने घेतले सात फेरे

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी आणि कतरीनाच्या लग्नाआधी कंडोम कंपनीची ही मजेदार पोस्ट


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें