Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी-आणि कतरीना उद्याच हनीमूनला रवाना होणार, कुठे जाणार? वाचा सविस्तर

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी-आणि कतरीना उद्याच हनीमूनला रवाना होणार, कुठे जाणार? वाचा सविस्तर
वधू-वरांच्या जोडीमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ खूपच सुंदर दिसत आहेत. विक्कीने लग्नात ऑफ व्हाइट शेरवानी घातली आहे. दुसरीकडे, कतरिना कैफ लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.

विकी आणि कतरीना हनीमुनला कुठे जाणार यांची सर्वांना उत्सुक्त होती. तीही माहिती समोर आली आहे. विकी आणि कतरीना उद्या मुंबई विमानतळावरून थेट मालदीवला हनीमूनला रवाना होणार आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 09, 2021 | 10:46 PM

मुंबई : बॉलिवूडची सुरस्टार जोडी विकी कौशल आणि कतरीना कैफ अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरीनाच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. अनेक भन्नाट पोस्ट सध्या विकी आणि कतरीनाच्या लग्नाच्य व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

उद्याच मालदीवला हनीमूनला रवाना होणार

त्यानंतर विकी आणि कतरीना हनीमुनला कुठे जाणार यांची सर्वांना उत्सुक्त होती. तीही माहिती समोर आली आहे. विकी आणि कतरीना उद्या मुंबई विमानतळावरून थेट मालदीवला हनीमूनला रवाना होणार आहेत. उद्या दुपारे ते साडेबाराच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल होतील, मात्र विमानतळाच्या बाहेर न पडता ते थेट मालदीवसाठी निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा होती.

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आटोपला लग्नसोहळा

विकी आणि कतरीना यांच्या लग्नानाला त्यांचा परिवार आणि काही मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. लग्नात काही खास नियमावलीही लावण्यात आली होती. लग्नाच्या ठिकाणाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचंही दिसून आले.

हिंदू विवाह पद्धतीने विकी-कतरीनाचे लग्न

विकी आणि कतरीनाचं लग्न हिंदू विवाह पद्धतीने झाले आहे. त्याचे काही सुंदर फोटोही समोर आले आहेत. लग्नाच्या आधी विकीने एका खास विंटेज कारमधून एन्ट्री मारल्याचीही माहिती समोर आली होती. विकी आणि कतरीनाच्या लग्नातील पोशाखाचीही सर्वत्र हवा आहे. या दिमाखदार लग्नसोहळ्यानंतर हे नवविवाहीत जोडपं उद्या हनीमूनला रवाना होणार आहे.

Mumbai Crime: कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण, नग्न व्हिडिओही काढला

Nagpur MLC Election : ‘मी असमर्थता दर्शवली नाही’, पत्रकावर छोटू भोयर यांचं स्पष्टीकरण; देशमुखांसाठी काम करणार असल्याचाही दावा!

BMC | मनपा कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें