Mumbai Crime: कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण, नग्न व्हिडिओही काढला

Mumbai Crime: कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण, नग्न व्हिडिओही काढला
कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण

या मारहाणीमुळे अल्पवयीन पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने वर्सोवा पोलीस ठाणे गाठत सदर मालकिनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 09, 2021 | 10:20 PM

मुंबई : कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र जबर मारहाण केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना अंधेरीतील वर्सोवा भागात घडली आहे. या मारहाणीत अल्पवयीन नोकरानीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने सदर मालकिनीविरोधात वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामावर उशिरा आली म्हणून अमानुष मारहाण

पीडित 17 वर्षाय मुलगी अंधेरी पश्चिमेला वर्सोवा परिसरात घरकाम करते. पीडिता नेहमीप्रमाणे 6 डिसेंबर रोजी घरकामासाठी सदर घरी गेली. मात्र त्या दिवशी कामावर पोहोचायला तिला थोडा उशिर झाला होता. यामुळे घर मालकीन तिच्यावर रागावली होती. पीडित मुलगी कामासठी घरी येताच रागाने लाल झालेल्या मालकिनीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मालकिनीने आधी तिला गंभीररित्या मारहाण केली. त्यानंतर तिला विवस्त्र केले. एवढ्यावरच मालकिनीचा अमानुषपणा थांबला नाही. पीडितेला विवस्त्र केल्यानंतर मालकिनीने पीडितेच्याच मोबाईलमध्ये तिचा न्यूड व्हिडिओ काढला. तसेच न्यूड फोटोही काढले. त्यानंतर तिला चप्पलने जबर मारहाण करीत अर्धमेले केले.

पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत

या मारहाणीमुळे अल्पवयीन पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने वर्सोवा पोलीस ठाणे गाठत सदर मालकिनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाल संरक्षण अधिनियमानुसार मारहाण, छेडछाड, अपमान आणि बाल संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान कामावर उशिरा येणे किंवा घरकामात काही क्षुल्लक चूक होणे अशा कारणांवरुन घरकाम करणाऱ्या मुलींना, महिलांना घर मालकांकडून मारहाण होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींना कामावर ठेवून त्यांच्याकडून अधिक काम करुन घेणे, मारहाण करण्याच्या घटना अधिक आहेत. याबाबत कठोर कायदे करुन घरकाम करणाऱ्यांना महिलांना संरक्षण देणे गरजेचे आहे. (A minor maid was stripped naked and beaten by her employer for being late for work)

इतर बातम्या

Pune Crime |मद्यधुंद चालकाने कार बीआरटी बसथांब्याला धडकवली दोन ठार ; दोन गंभीर

Kalyan Crime : कल्याणमध्ये दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें