Bheemla Nayak Trailer : ‘भीमला नायक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता पवन कल्याण!

सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणचा (Pawan Kalyan) चित्रपट 'भीमला नायक' (Bheemla Nayak) लवकरच रिलीज होणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून पवनच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते.

Bheemla Nayak Trailer : भीमला नायक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता पवन कल्याण!
भीमला नायक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
| Updated on: Feb 22, 2022 | 8:39 AM

मुंबई : सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणचा (Pawan Kalyan) चित्रपट ‘भीमला नायक’ (Bheemla Nayak) लवकरच रिलीज होणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून पवनच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. त्याचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये पवन कल्याण एका खास पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये राणा डग्गुबती (Rana Daggubati) देखील दिसणार आहे.

राणा डग्गुबती आणि पवन कल्याणची जोडीसोबत

या चित्रपटाचा ट्रेलर पाहून नक्कीच तुम्हाला चित्रपट किती खतरनाक आहे याची कल्पना येईल. चित्रपटामध्ये पवन कल्याणचे नाव भीमला नायक आहे. तो एका प्रामाणिक आणि दबंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर राणा डग्गुबतीच्या पात्राचे नाव डॅनियल शेखर आहे. या ट्रेलरचा हाईप खुद्द पवन कल्याण आहे, तसेच त्याच्या आणि राणामधील संघर्ष हा देखील या चित्रपटातील एक मजबूत दुवा आहे.

इथे पाहा चित्रपटाचे ट्रेलर

चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार 

रिलीजच्या अवघ्या चार दिवस आधी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पवन कल्याण आणि राणा डग्गुबती मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांसोबत नित्या मेनन आणि संयुक्ता देखील दिसणार आहेत. सागर के चंद्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्याचे संगीत थमन एस यांनी दिले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद त्रिविक्रम यांनी लिहिले आहेत.

संबंधित बातम्या : 

“टॉम क्रूझ भयंकर रागीट, तोंडावर फेकला अल्बम”; एक्स मॅनेजरने सांगितला किस्सा

‘नात्यामधील फसवणूक ही आता गंभीर बाब राहिली का?’; दीपिकाच्या उत्तराने वेधलं लक्ष