AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कसौटी’च्या अनुरागला 44 व्या वर्षीं ‘प्रेरणा’ सापडली, सिजेन खानचं बिर्याणीवालं प्रपोज कसं ठरलं हिट?

प्रसिध्द टीव्ही अभिनेते सिजेन खान (Cezanne Khan) लवकरच लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, यावर्षी ते गर्लफ्रेंड (Girlfriend) अफसीनसोबत लग्न (Married) करणार आहेत. सिजेन आणि अफशीन गेल्या तीन वर्षांपासून एकमेंकांना डेट करत आहेत.

'कसौटी'च्या अनुरागला 44 व्या वर्षीं 'प्रेरणा' सापडली, सिजेन खानचं बिर्याणीवालं प्रपोज कसं ठरलं हिट?
सिजेन खान करणार यावर्षीं लग्न
| Updated on: Feb 21, 2022 | 2:16 PM
Share

मुंबई : प्रसिध्द टीव्ही अभिनेते सिजेन खान (Cezanne Khan) लवकरच लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, यावर्षी ते गर्लफ्रेंड (Girlfriend) अफसीनसोबत लग्न (Married) करणार आहेत. सिजेन आणि अफशीन गेल्या तीन वर्षांपासून एकमेंकांना डेट करत आहेत. सिजेन खान हे 44 वर्षांचे आहेत. घरा-घरामध्ये पोहचलेली फेमस टीव्ही सीरियल कसौटी जिंदगी की या मालिकेमध्ये अनुराग बसूची भूमिका करताना सिजेन खान यांना प्रसिध्दी मिळाली.

44 व्या वर्षीं लग्न करण्याचा निर्णय घेतला! 

अफशीनने 2020 मध्ये सिजेन खान यांच्यासाठी खास बिर्याणी तयार केली होती. त्यानंतर ती बिर्याणी खाल्ल्यानंतरच सिजेन हे अफशीनच्या प्रेमामध्ये पडले आणि त्यानंतर अफशीनला प्रपोज केला. अफशीन ही मूळ उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील आहे. विशेष म्हणजे अफशीन आणि सिजेन यांना 2020 मध्ये लग्न करायचे होते. मात्र, कोरोनामुळे त्यांना लगेचच लग्न करणं शक्य झालं नाही. सिजेन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला बोलताना सांगितले की, आम्ही तीन वर्षांपासून एकत्र आहोत आणि आनंदी आहोत.

लग्नासाठी हवी असलेली मनासारखी मुलगी शेवटी भेटलीच

कोरोना असल्यामुळे आम्ही लग्न करणे शक्य झाले नाही. यावर्षींच्या शेवटी आम्ही लग्न करण्याचा विचार करतो आहोत. पण मला असे वाटते की, लग्न करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वयाची अजिबात गरज नाहीये. मला लग्नाची घाई करायची नव्हती. मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो जी साधी आणि प्रामाणिक असेल. तसेच तिने कुटुंब आणि नातेसंबंध व्यवस्थित सांभाळायला हवेत आणि ती मला अखेर अफशीनच्या स्वरूपात भेटली. तसेच पुढे बोलताना सिजेन म्हणाले की, अफसीन बिर्यानी एकच नंबर तयार करते.

संबंधित बातम्या : 

Rashmika Mandanna : ज्या रश्मिकावर अख्ख्या देशाचा क्रश होता, तिचाच साखरपुडा तुटलेला, काय झालेलं नेमकं?

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार?…नॅशनल क्रश असलेली रश्मिका ‘या’ घराण्याची सून होणार!

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...