‘नात्यामधील फसवणूक ही आता गंभीर बाब राहिली का?’; दीपिकाच्या उत्तराने वेधलं लक्ष

'गेहराईयाँ' या चित्रपटात दीपिकाने साकारलेल्या भूमिकेवरून तिला विचारण्यात आला प्रश्न

'नात्यामधील फसवणूक ही आता गंभीर बाब राहिली का?'; दीपिकाच्या उत्तराने वेधलं लक्ष
Deepika PadukoneImage Credit source: Instagram/ Deepika Padukone
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 4:58 PM

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) नुकताच प्रदर्शित झालेला ‘गेहराईयाँ’ (Gehraiyaan) हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. शकुन बत्रा (Shakun Batra) दिग्दर्शित या चित्रपटात दीपिकाने अलिशा या पात्राची भूमिका साकारली आहे. सहा वर्षांच्या कंटाळवाण्या आणि काहीच नाविन्य न उरलेल्या रिलेशनशिपमध्ये असलेली अलिशा तिच्या चुलत बहिणीच्या पतीशी अफेअर करू लागते. नात्यामधील फसवणुकीबाबत या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. दीपिकाने साकारलेल्या भूमिकेवरूनच तिला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फसवणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. फसवणूक ही आता खरीच तेवढी गंभीर बाब आहे का, असा प्रश्न ‘व्ही आर युवा’ या मुलाखतीत दीपिकाला विचारण्यात आला. यावर दीपिका नेमकं काय म्हणेल, याकडे सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. ‘गेहराईयाँ’ या चित्रपटात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवां यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

काय म्हणाली दीपिका? “फसवणुकीला मी दुजोरा देत नाही. पण इतरांच्या नातेसंबंधांवर मी माझी वैयक्तीक मतं मांडावीत, असंही मला वाटत नाही. मग त्या नात्यात फसवणूक झाली असो वा नसो किंवा मग त्याबाबत ते सहमत असो वा नसो. कोणतंही नातं हे कनेक्शनवर आधारित असतं. जर तुमच्या नात्यातील ते कनेक्शनच हरवलं असेल तर ते फार काळ टिकत नाही”, अशा शब्दांत दीपिकाने तिचं मत मांडलं.

नात्यामधील फसवणुकीबाबत बोलताना ती पुढे म्हणाली. “एकमेकांवरील विश्वास ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शारीरिक आकर्षण ही एक गोष्ट आहे, पण जर का भावनिक फसवणूक होत असेल तर मला जास्त वाईट वाटेल. पार्टनरची फसवणूक करत दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवणं ही फार गंभीर बाब नाही असं मी म्हणत नाही. पण भावनिक फसवणूक हे इतर कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपेक्षा अधिक त्रासदायक असतं.” ‘गेहराईयाँ’ या चित्रपटात उच्चभ्रू वर्गातील भावनिक नात्यांचा गुंता अधोरेखित करण्यात आला आहे.

दीपिका लवकरच ‘पठाण’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत झळकणार आहे. याशिवाय फायटर, प्रोजेक्ट के आणि ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.