
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केलीये. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (Movie) ठरलाय. पठाण चित्रपटाने ओनपिंग डेलाच जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिसवर (Box office) कलेक्शन केले. पठाण चित्रपटाला फक्त भारतामधूनच नाहीतर विदेशामधूनही प्रचंड प्रेम मिळाले. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिले की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही.
पठाण चित्रपटाच्या तूफान कामगिरीनंतर लगेचच शाहरुख खान याने डंकी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. आता सध्या शाहरुख खान हा जवान चित्रपटाच्या शूटिंमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे या पूर्वीच शाहरुख खान याने दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पठाण चित्रपटाची वाट आतुरतेने पाहात होते.
शाहरुख खान याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शाहरुख खानने 2023 चा टाइम 100 पोल जिंकला आहे आणि टाइम 100 च्या यादीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व बनला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये शाहरुख खान याने अनेक दिग्गज लोकांना मागे टाकले आहे.
2023 टाइम 100 पोलसाठी तब्बल 12 लाखांहून अधिक लोकांनी वोट केले. ज्यामध्ये शाहरुख खान पहिल्या स्थानावर राहिला आहे. विशेष बाब म्हणजे या यादीमध्ये सेरेना विल्यम्स, मार्क झुकेरबर्ग, मिशेल येओह यांचाही समावेश आहे. फुटबॉल स्टार लियोनेल मेसी पाचव्या क्रमांकावर आहे. शाहरुख खान याचे चाहते फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशातही आहेत.
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात सतत विरोध केले जात होता. मात्र, यादरम्यान शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुख खान याने काही खास पठाण चित्रपटाचे प्रमोशनही केले नाही. परंतू चित्रपटाने धमाकेदार कामगिरी नक्कीच बाॅक्स आॅफिसवर केलीये.
पठाण चित्रपच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.